कुबेरांचे अज्ञान हेच माफीनाम्याचे कारण...

असंतांचे संत हा अग्रलेख लिहून नंतर दुस-या दिवशी कुबेरांनी माफीनामा मागितला असला तरी,त्यांचे भक्तगण कुबेरांचे समर्थन करताना कुबेर किती हुशार,बुध्दीवादी,अभ्यासू आहेत,याचा डांगोरा पिटत आहेत.व्यवस्थापकांनी त्यांच्यावर दबाब आणला,त्यामुळे कुबेरांना माघार घ्यावी लागली असा जावाई शोधही लावला आहे.मात्र कुबेरांचे अज्ञात या अग्रलेखात उघडे पडल्यानेच त्यांनी माफीनामा मागितला आहे.
दि.१७ मार्च रोजी कुबेरांनी लोकसत्तामध्ये असंतांचे संत हा ज्येष्ठ समाजसेविका मदर तेरेसा यांच्यावर जो अग्रलेख लिहिला आहे,तो अपु-या माहितीवर आधारीत आहे.या अग्रलेखानंतर वाचकांनी त्यांना अनेक पत्रे पाठवली,त्यापैकी चार पत्रे दि.१८ मार्च रोजी लोकसत्तामध्येच अग्रलेखाच्या पानावर लोकमानस सदरात प्रकाशित करण्यात आलेली आहेत.त्या चार वाचकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे कुबेरांकडे नव्हती.जेम्स लेन या हरामखोरांने जसे विकृत लिखाण केले आहे,तसेच मदर तेरेसा यांच्यावर काही जणांनी विकृत लिखाण केले आहे,ते वाचून कुबेरांनी आपले दिवे पाजळले आहेत.एक दिवस लोकसत्ताच्या एसी ऑफीसच्या बाहेर पडून कुष्ठरोग्याची सेवा करून दाखवा मग समजेल काय असते समाजसेवा असे थेट आव्हान देणारे पत्रही लोकसत्तेकडे आले.त्याची उत्तरे कुबेराकडे नव्हती.
या अग्रलेखात कुबेरांचे अज्ञान बाहेर पडलेले आहे.त्यांची बौध्दीक दिवाळखोरी त्यातून निघालेली आहे.म्हणूनच त्यांनी अग्रलेखच मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.तरीपण त्यांचे भक्तगण कुबेरांचे गोडवे गात कुबेरांची री ओढत आहेत.त्यांचे भक्तगण जाणीवपुर्वक चर्चा घडवून कुबेरांना मोठे करण्याचे आणि त्यांना समर्थन देण्याचे काम करत आहेत.विशेषत: त्यात काही  विशिष्ठ जातीचे लोक आघाडीवर आहेत.
शरद पवार यांच्यावर टीका झाली की जातीयवाद होत नाही,रामदास आठवलेवर टीका झाली तर जातीयवाद होत नाही.छगन भुजबळावर टीका झाली तरी जातीयवाद होत नाही मात्र बाबासाहेब पुरंदरेवर टीका झाली की जातीयवाद होतो.मीडीयात विशिष्ठ लोकांची मक्तेदारी झाली असून,ही न दिसणारी जातकुळी बहुजणांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.आता कुबेरांंचे अज्ञात बाहेर पडले असताना,त्यांना सपोर्ट करत आहे,यापेक्षा आश्चर्य दुसरे नाही.
ज्यांनी कुबेराची बाजू घेतली आहेत,त्यांच्यासाठी आम्ही लोकसत्तामधील चार पत्रांची लिंक देत आहोत.त्या प्रश्नाची उत्तरे कुबेराकडे नव्हती.तुमच्याकडे असतील तर नक्की द्या मग कळेल कुबेर शहाणे की आपण शहाणे...
कुबेराच्या अग्रलेखाकडे त्यांच्या भक्तगणाचे लक्ष गेले परंतु लोकमानसमध्ये प्रकाशित झालेल्या चार पत्राकडे कोणाचे लक्ष गेले नाही,हे त्यांच्या भक्तगणांचे अज्ञातच म्हणावे लागेल.

- एक सजग वाचक