पुढारीमध्ये संपादकीय विभागासाठी मुलाखती सुरू

औरंगाबाद - १७ सप्टेंबरपासून सुरू होणा-या पुढारीच्या औरंगाबाद आवृत्तीसाठी संपादकीय विभागासाठी मुलाखतीचा सिलसिला सुरू झाला आहे.रिपोर्टर ते वृत्तसंपादक पदासाठी शनिवारी एकूण ६० ते ७० जण मुलाखतीसाठी उपस्थित होते.त्यात बंद पडलेल्या लोकपत्र,स्थानिक दैनिक सांजवार्ता,आनंद नगरी या वृत्तपत्रातीलच भरणा अधिक होता.लोकमत,दिव्य मराठीतील मोजके लोक हजर होते.सकाळमधील एकही कर्मचारी दिसला नाही.
पुढारीच्या औरंगाबाद आवृत्तीसाठी जाहिरात,वितरण,प्रॉडक्शन,प्रशासन आणि प्रिंटीग विभागाच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या होत्या.त्यात युनिट हेडने वशिलेबाजी केल्याचे बेरक्याने निदर्शनास आणून दिल्यानंतर संपादकीय विभागाच्या मुलाखतीसाठी कोल्हापूरहून चौघांची खास टीम औरंगाबादेत आली आहे.त्यांनी मुलाखती घेताना युनिट हेड आणि निवासी संपादकास दूर ठेवून मुलाखती घेतल्या.मात्र प्रतिस्पर्धी दैनिकातील लोक कमी आल्याने पुढारीकारांचा भ्रमनिरास झाला आहे.
युनिट हेडने सकाळमधील टीम फोडण्याचा प्रयत्न केला होता,परंतु सकाळमधील एकही कर्मचारी मुलाखतीसाठी आला नाही.लोकमतचे चौघे आणि दिव्य मराठीतील सहाजण मुलाखतीसाठी आले होते.त्याची लिस्ट बेरक्याच्या हाती आहे,परंतु त्यांचे भवितव्य लक्षात घेवून बेरक्या ही लिस्ट प्रसिध्द करणार नाही.
एकंदारीत रागरंग पाहता,पुढारी औरंगाबादेत १७ सप्टेबर रोजी सुरू होणार,अशी चिन्हे आहेत.पहिल्या टप्यात औरंगाबाद शहर आणि जिल्हा,दुस-या टप्यात जालना आणि तिस-या टप्प्यात बीड या तीन जिल्ह्यातच पुढारी जाणार आहे.लातूर किंवा नांदेडला प्रिटींग युनिट बसल्यानंतर नांदेड,लातूर,परभणी,हिंगोली सुरू होणार आहे.सोलापूरला प्रिटींग युनिट बसल्यानंतर उस्मानाबादला अंक दिला जाणार आहे.त्यामुळे सध्या तरी औरंगाबाद पुढारी फक्त औरंगाबाद,जालना जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे.