समीरण वाळवेकर यांचा राजीनामा

मुंबई - जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मुख्य संपादक समीरण वाळवेकर यांनी राजीनामा दिला आहे.या राजीनाम्याचे कारण स्पष्ट नसले तरी चंद्रमोहन पुप्पाला आल्यामुळे वाळवेकरांनी राजीनामा दिला असावा,अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
टीव्ही मीडियाचा दांडगा अनुभव असलेल्या वाळवेकरांची सप्टेंबर 2015 मध्ये जय महाराष्ट्रमध्ये एन्ट्री झाली होती.त्यानंतर वाळवेकर,प्रसन्न जोशी आणि निलेश खरे या तिघांनी चॅनेलचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु हे  चॅनल  अनेक केबल आणि डीटीएचवर दिसत नसल्यामुळे आणि अपुर्‍या यंत्रणेमुळे  टीआरपी वाढलाच नाही.त्याचबरोबर रिपोर्टरची टीम म्हणावी तितकी सक्षम नाही.अनेक रिपोर्टरना फोनो कॉल सुध्दा नीट देता येत नाही.
टीआरपी वाढवा म्हणून मालक सुधाकर शेट्टी यांनी अनुभवी चंद्रमोहन पुप्पाला यांना संचालक मंडळावर काही दिवसांपूवी घेतले आहे.पुप्पाला येताच वाळवेकर यांनी राजीनामा दिल्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.