मुंबई
 - नंबर 1 दावा करणाऱ्या एबीपी माझाने काल रविवारी एकाच दिवशी तीन 
बातम्यांमध्ये मोठी घोडचूक केली, या तिन्ही बातम्याबाबत सोमवारी जाहीर 
दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की चॅनेलवर ओढवली...
बातमी नं.1
14 भोंदू बाबाची जी यादी जाहीर करण्यात आली त्यात चुकीचे आणि भलत्याच बाबाचे फोटो वापरण्यात आले...
बातमी नं. 2
दोन महिन्यांत पेट्रोलचे भाव 16 रुपयांनी वाढले
- हे सफशेल चुकीचे निघाले , दोन महिन्यांत 6 रुपये भाव वाढले आहेत..
आणि 
बातमी नं. 3
औरंगाबाद बँक कर्मचारी खून प्रकरणात आरोपी म्हणून भलत्याच महिलेचे फोटो वापरण्यात आले ...
यामुळे एका महिलेची नाहक बदनामी झाली ..
यामुळे एका महिलेची नाहक बदनामी झाली ..
पहिल्या दोन बातम्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसला तरी तिसऱ्या बातमी प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झालाय...
बातम्यांची "खिचडी" कच्ची शिजत असल्यामुळे संपादक राजीव खांडेकर यांना  मनस्ताप सहन करावा लागतोय ....
एव्हडे
 मात्र खरे आहे की, चॅनेलला नंबर 1 राहण्यासाठी  अतिजलद बातम्या द्यावा 
लागत आहेत,वेगळ्या स्टोऱ्या द्यावा लागत आहेत, त्यातून अश्या घोडचुका घडत 
आहेत ..
"उघडा डोळे बघा नीट" अशी चॅनेलची टॅगलाईन असली तरी, चॅनेललाच आता "डोळे" झाकून नव्हे  उघडे ठेवून काम करण्याची गरज आहे...
 


 
 
 
%20(1).jpeg)