अँकर विलास बडे याची लवकरच घर वापसी !

मुंबई - "एबीपी  माझा " चा युवा अँकर विलास बडे लवकरच घर वापसी करतोय. त्याने एबीपी  माझाकडे  राजीनामा सुपूर्द केला असून नोटीस परेड संपताच  IBN लोकमत जॉईन करेल. बडेला एबीपी माझा पेक्षा ३० टक्के पॅकेज वाढवून मिळाल्याची  चर्चा आहे.
पत्रकारितेची  पदवी घेतल्यानंतर मुंबई सकाळ मध्ये  काही काळ बातमीदार म्हणून काम केलेल्या विलास बडे यांनी नंतर  साप्ताहिक लोकप्रभा मध्ये  अनेक स्टोऱ्या गाजवल्या. त्यानंतर त्याने IBN लोकमत मध्ये एंट्री केली. टीव्ही मीडियाचा अनुभव घेतल्यानंतर जय महाराष्ट्र मध्ये  रिपोर्टींग केली. त्यानंतर "एबीपी  माझा " मध्ये अँकर म्हणून गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत होता.  मात्र बडेनी   पुन्हा त्यांनी घर वापसी  करण्याचा निर्णय घेतलाय. बडे यास IBN लोकमत मध्येही न्यूज अँकर आणि सिनियर प्रोड्युसर म्हणून पद देण्यात आले आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

IBN लोकमत चे नामकरण  न्यूज १८ लोकमत असे  होणार आहे. त्यामुळे TRP आणखी घसरणार आहे. मात्र डॅमेज कंट्रोल करण्यासाठी चॅनलने चांगली माणसे भरण्यास सुरुवात केली आहे. बडे सोबत "एबीपी  माझा"ची  आणखी  एक युवती अँकर IBN लोकमत जॉईन करणार असल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षभरात एकूण १५ जणांनी "एबीपी  माझा " सोडला असून चॅनल मध्ये  काही विशिष्ठ लोकांची लॉबिंग सुरु आहे. त्यामुळे अनेकांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळेच अनेकजण राजीनामा देत आहेत.

IBN लोकमत खड्यात घातलं कुणी ?

मंदार फणसे यांनी IBN लोकमतचा राजीनामा दिल्यानंतर सहा महिने संपादक पद रिक्त होते. त्यामुळे माणिक मोतीकडे जवळपास संपादक पदाचा चार्ज होता. मात्र माणिक मोतीने घाणेरडे राजकारण करून चॅनेल मातीत घातले. चॅनेल तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यामुळे नवीन संपादक येताच माणिक मोतीचे अधिकार कमी केले. त्यात काहीजण चॅनल सोडून गेले. एका प्रेम प्रकारणामुळे चॅनल बदनाम झाले.
त्यात नाव बदलले तर अजून TRP घसरेल हि भीती निर्माण झाल्यामुळे चॅनलने अनेक चांगल्या लोकांना स्वतःहून ऑफर दिली आहे. त्यामुळं अनेक चांगले लोक येत्या काही काळात जॉईन होतील, असे सांगितले जातंय.

माणिक मोती ने उघडा डोळे बघा नीट मध्ये संधीसाधू प्रकरण केल्यानंतर खरं तर परभणी गाठावी लागली होती. मात्र कसे तरी साम मिळाले होते. उस्मानाबादच्या एका स्टार रिपोर्टरच्या शिफारशीनुसार बदलून गेलेल्या संपादकांनी   माणिक मोतीला IBN लोकमत मध्ये संधी दिली होती. मात्र नेहमीच कुकर्मची सवय लागलेली असल्यामुळे अखेर मातीतच पाय गेले. आता चांगल्या समाजासाठी मध्ये माणिक मोती काय दिवे लावणार ? हे लवकरच कळेल.


जाता जाता

विलास बडे सांगतोय स्वतःची  कारकिर्द