IBN लोकमतचे लवकरच नामकरण !


मुंबई - "चला जग जिंकू" या अशी  टॅगलाईन घेवून आलेल्या IBN लोकमत मधून निखिल वागळे सह एक मोठी टीम बाहेर पडल्यानंतर "महाराष्ट्राचं महाचॅनल" अशी नवी टॅगलाईन करण्यात आली होती; आता चॅनलचे नावच बदलण्यात येत आहे. "न्यूज १८ लोकमत" असे चॅनलचे नाव राहील,
नेटवर्क १८ चे अधिकार उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे गेल्यानंतर हिंदी न्यूज चॅनल IBN 7 चे नाव NEWS 18 इंडिया करण्यात आले होते. मराठी चॅनल IBN लोकमतचे नाव मागेच बदलण्यात  येणार होते. मात्र वागळे गेल्यामुळे अगोदरच TRP  घसरल्यामुळे अजून TRP  घसरेल म्हणून हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता.  आता त्याचा मुहूर्त सापडला आहे."न्यूज १८ लोकमत" हे नवे  नामकरण  येत्या महिनाभरात होईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

सध्या चॅनल मध्ये अनुभवी संपादक नसल्यामुळे TRP  अजून घसरला असून चॅनल चौथ्या क्रमांकावर गेले आहे. चॅनलचे नाव बदलल्यानंतर आणखी TRP  घसरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. चॅनेल मध्ये "काथ्याकूट" सुरु असल्यामुळे चॅनलची वाट लागत आहे.
गळती सुरु
नवे संपादक येताच, आऊटपुट हेड माणिक मुंडे टीव्ही ९ मध्ये गेले.त्यानंतर IBN लोकमतचा मुख्य कणा असलेले अनिल सरंगळे चॅनलला रामराम ठोकून टाइम्स नाऊला गेले आहेत. अनिल सरंगळे हे चॅनलमध्ये सुरुवातीपासून ग्राफिक्स हेड होते. ते गेल्यामुळे ग्राफिक्सची वाट लागणार आहे. त्याचबरोबर दोन वरिष्ठ लवकरच बाहेर पडणार आहेत. त्यामुळे "महाराष्ट्राचं महाचॅनल" फक्त नावापुरतं राहील अशी शंका व्यक्त केली जात आहे. 


News Update 
IBN लोकमत मध्ये गळती सुरूच...
मंगेश चिवटे यांचा राजीनामा ... जय महाराष्ट्र जॉईन करणार
चॅनेलमध्ये काथ्याकूट सुरूच  ... आणखी दोन वरिष्ठ राजीनामा देण्याच्या तयारीत


.....

जाता जाता

मुंबई - टीव्ही ९ मधून बाहेर पडलेले निलेश खरे अखेर साम चॅनल मध्ये संपादक म्हणून जॉईन  झाले आहेत.

ABP माझा, मी मराठी, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ असा प्रवास करीत खरे साम मध्ये जॉईन झाले आहेत.
बेरक्याचे वृत्त नेहमीप्रमाणे "खरे"  ठरले आहे.