> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

रविवार, २० मे, २०१८

धमकावून पत्रकारांनी उकळले २३ हजार रुपये

मीरारोड - कथित पत्रकरांनी साथीदारांसह एका कथीत पत्रकारास तु बोगस असल्याचे धमकावुन २३ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा खळबळजनक प्रकार मीरारोडच्या नयानगर मध्ये घडला आहे. पोलीसांनी तीघांना अटक केली असुन एकाचा शोध सुरु आहे.

एका युट्युब चॅनल मध्ये पत्रकारिता करत असलेला शैलेश गणपत पटेल (३५) रा. रॉयल कॉम्पलेक्स, जयभवानी लेन, मालाड हा नया नगर मध्ये राहणारया आपल्या सहकारी कर्मचा-याच्या घरी आला होता. त्यावेळी आयुब इब्राहिम शेख (४४) रा. सनराईज अपार्टमेंट, नया नगर
याने पटेल याला फोन करुन खाली बोलावले. पटेल खाली गेला असता त्याला अयुब याने आपण अधिकारी असून तुझे पत्रकारितेचे ओळखपत्र तपासायचे आहे असे सांगीतले. पटेलने ओळखपत्र दाखवले असता मुदत संपली असुन तो बोगस पत्रकार असल्याचे त्याला सांगत शम्स मस्जिद जवळील कार्यालयात नेले.

पटेल याने मदतीसाठी आपले परिचित पंकज विजय बेदी (३७) रा. राज एक्जोटिक्स, हाटकेश व राजेश ुहरिप्रसाद पांडे (३७) रा. लक्ष्मी नगर, मालाड या दोघा कथीत पत्रकारांना फोन करुन बोलावुन घेतले.
पंकज हा जनता समाचार युट्युब चॅनल व साप्ताहिकचा पत्रकार असल्याचे सांगतो. तर पांडे देखील असाच कथीत पत्रकार आहे.

बेदी व पांडे दोघे आल्यावर आयुब याने पटेल हा बोगस पत्रकार असुन कारवाई करायची नसेल तर एक लाख रुपयांची खंडणी मागीतली. अखेर २० हजार रुपयात मांडवली झाली. पांडे याने साळसुदपणाचा आव आणत मी माझी सोन्याची चैन, अंगठी गहाण ठेऊन पैसे आणुन देतो सांगीतले. व पांडेनेच २० हजार रुपये आणुन दिल्या नंतर पटेलची सुटका झाली. दुसरया दिवशी पटेल याने पांडेला २० हजार व ३ हजार व्याज मिळुन २३ हजार रुपये दिले.

परंतु त्याला अयुब, पांडे व बेदी यांचे संगनमत असल्याचा संशय आला. अअखेर नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलीसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. अयुब, पांडे व बेदी या तीघांना अटक केली असुन त्यांच्या चौथ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.

साभार - लोकमत 

रविवार, ६ मे, २०१८

कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस आता संपले

सुनील ढेपे
पुणे - हातात पेन घेवून कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस आता संपले आहेत,  प्रत्येक पत्रकाराला बातमीबरोबर कॉम्प्युटर, इंटरनेट आणि अत्याधुनिक यंत्रणेचे ज्ञान हवे. जो पत्रकार    काळाबरोबर चालणार नाही तो पत्रकारितेतून कालबाह्य होईल,असा गर्भित इशारा ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे  यांनी दिला.

पुण्यातील कर्वे नगर रोडवरील  कॅलिडस इंटरनॅशनल मीडिया अँड आर्ट्स अकॅडमी मध्ये तिसरी राज्यस्तरीय डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, यावेळी पत्रकार ढेपे बोलत होते, यावेळी सकाळचे संपादक सम्राट फडणीस, पुढारी सिटी एडिटर विक्रांत पाटील, संचालक पंकज इंगोले उपस्थित होते.

ज्या पत्रकारास संगणकाचे ज्ञान नाही तो निरक्षर पत्रकार  ठरत आहे, आपण स्वतः  20 वर्षांपासून संगणक हाताळत असून, काळाबरोबर नाही चाललो असतो तर आऊटडेटेड पत्रकार ठरलो असतो, असे सांगून पत्रकार ढेपे म्हणाले की, वेबसाईट अपलोड करणे फार अवघड काम नाही, मात्र त्याचे टेक्निकल ज्ञान घेणे आवश्यक आहे, बातमी लिहून ती फुलवणे, आकर्षण हेडिंग देणे हेच महत्वाचे आहे.
न्यूज चॅनल आणि प्रिंट मीडिया मधील संधी कमी झाल्याने तरुण पत्रकारांनी डिजिटल मीडियाचे ज्ञान घ्यावे असे आवाहनही ढेपे यांनी केले .वेबसाईट आणि सोशल मीडियामधून आर्थिक प्राप्ती कशी होते, याच्या टिप्सही त्यांनी यावेळी सांगितल्या.

पंकज इंगोले, सम्राट फडणीस, विक्रांत पाटील, सुनील ढेपे
सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी इंटरनेटचा उगम, त्याची व्याप्ती, आवाका, भविष्यात काय होणार याबद्दल मार्गदर्शन केले, पुढारीचे सिटी एडिटर विक्रांत पाटील यांनी कंटेंट, गुगल सर्चर्निग,लोकांच्या आवडी निवडी याबाबद्दल माहिती दिली.
दुपारच्या सत्रात सामचे संपादक निलेश खरे यांनी युट्युब मॉनिटेशनबद्दल माहिती सांगितली तर लोकमतचे डिजिटल संपादक  तुळशीदास भोईटे यांनी, सोशल मीडिया कसा हँडल करावा, लोकांना नेमके काय  आवडते यावर भाष्य केले.

तुळशीदास भोईटे, सुनील ढेपे, निलेश खरे, पंकज इंगोले, विक्रांत पाटील

प्रास्ताविक  संचालक पंकज इंगोले यांनी केले.यापुढे कोल्हापूर, शिर्डी, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आदी ठिकाणी डिजिटल मीडिया कार्यशाळा घेण्याचा मनोदय  त्यांनी व्यक्त केला, त्यासाठी त्या त्या ठिकाणच्या पत्रकार संघांनी पुढे येण्याची गरज आहे असे इंगोले म्हणाले.


टीव्ही 9 मराठीत पुन्हा अमराठी बॉस

मुंबई - टीव्ही 9 मराठीने चॅनल कंट्रोल करण्यासाठी पुन्हा एकदा मराठीतलं ओ की ठो कळत नसलेला बॉस स्टाफच्या मानगुटीवर बसवला आहे. रोहीत विश्वकर्मा नावाचा इंडिया टीव्हीतून आयात केलेला पत्रकार टीव्ही 9 मराठीचा मॅनेजिंग एडिटर होणार आहे. रोहीत विश्वकर्मा हा विनोद कापरी यांचा खास माणूस आहे.
गणेश कनाटे,  तुळशीदास  भोईटे, निलेश  खरे, उमेश कुमावत, सचिन परब एवढे अपवाद सोडले तर या चॅनलने कायम अमराठी बॉसला सगळं आंदण दिलं आहे. कापरीचा खास एवढेच कॉलिफिकेशन  असलेल्या विश्वकर्माची यापुढे हुजरेगिरी आणि चमचेगिरी करायच्या उद्देशाने त्याला काय आवडतं याची माहिती बेदम आणि टकलू हैवान मिळवायला लागले आहेत.

बुधवार, २ मे, २०१८

पुण्यनगरीत साबळे, खोरे यांची एन्ट्री

पुणे - भागा वरखडे आणि सुनील देशपांडे यांना डच्चू देण्यात आल्यानंतर पुण्यनगरीत संपादक म्हणून श्रीकांत साबळे आणि सल्लागार संपादक म्हणून अरुण खोरे यांची वर्णी लागली असून, या दोघांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे.
पुण्यात पुण्यनगरीचा खप प्रचंड घसरला आहे. त्याचे खापर निवासी संपादक भागा वरखडे आणि सहसंपादक सुनील देशपांडे यांच्यावर फोडण्यात आले आणि दोघांना नारळ देण्यात आला होता. त्यानंतर साबळे आणि खोरे यांना संधी देण्यात आली आहे. मालक  बाबा शिंगोटे यांनी काल दोघांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
साबळे यापूर्वी पुढारीत सोलापूर ब्युरो चीफ म्हणून कार्यरत होते. खोरे यांनी लोकसत्ता,लोकमत, प्रभात आदी वृत्तपत्रात काम केले आहे.

गोडबोले यांना नारळ , सुतार पुन्हा पुढारीत !

पुणे - पुढारीचे कार्यकारी संपादक आल्हाद गोडबोले यांना आज अचानक नारळ  देण्यात आला असून, पुन्हा नंदकुमार सुतार यांना घेण्यात आले आहे. येणाऱ्या विधानसभा आणि  लोकसभा निवडणुकीत बक्कळ धंदा देण्याचे वचन सुत्तारने पद्मश्रीना दिले आहे.
सुतार यांची सकाळमधून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांच्याकडे पुढारी हा एकमेव पर्याय होता. यापूर्वी तीन वेळा पुढारी सोडलेल्या सुतार यांना पुन्हा संधी मिळणार की नाही याबाबत संभ्रम होता. पुढारीचे कर्मचारीही याबाबत अंधारात होते.
काल रात्री अचानक मुख्य कर्मचाऱ्यांना बुधवारी  सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेल्या मिटिंगबाबत एसएमएस आले आणि त्यात  कार्यकारी संपादक आल्हाद गोडबोले  यांना निरोप देण्यात आला तर नंदकुमार सुतार  यांचे स्वागत करण्यात आले. सुतार यांच्या नियुक्तीमुळे अनेक कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.

फेसबुक वर शेअर करा

Facebook