बीडला मराठवाड्यातील पत्रकारांचा मेळावा

नागपूर य़ेथील टीव्ही ९ चे पत्रकार कौशल पांडे यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेले खोटे खटले आणि धारूर येथील तीन पत्रकारांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या  पार्श्वभूमीवर "पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या" वतीने बीड येथे दि.10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि कॅबिनेट मंत्री तसेच नारायण राणे समितीचे एक सदस्य जयदत्त क्षीरसागर यांना पाचारण करण्यात येणार आहे.राज्यातील १६ प्रमुख स़घटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या हल्ला विरोधी  कृती समितीचे मुंबईतील सर्व सदस्य मेळाव्यास ऊपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रतील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनात सातत्याने वाढ होत आहे .माफिया .राजकारणी आणि पोलिसांकडून होणाऱ्या हल्ल्यापासून पत्रकारांना संरक्षण  देण्यासाठी एक कायदा करावा आणि पत्रकारांवरील हल्ला हा अजामिनपात्र गुन्हा ठरवावा अशी मागणी गेली वर्षभर हल्ला विरोधी समिती करीत आहे.मात्र सरकार त्याला तयार नाही.कालापव्यय करण्यासाठी सरकारने नाराय़ण राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली .या समितीने आपला अहवाल अजूनही दिलेला नाही.या पार्श्वभूमी वर आंदोलनाची पुढील दिशा काय असेल ते बीड येथील मेळाव्यात नक्की केले जाईल.महाराष्ट्रात गेल्या सव्वा दोन वर्षात १८९ प्रत्रकारांवर हल्ले झाले आहेत.त्यातील ७० प्रकारांची माहिती समितीने तयार केलेल्या व्हाईटपेपर मध्ये देण्यात आली आहे,.राज्यात गेल्या २५ वर्षात ११ पत्रकारांचे खून झाले असून गेल्या १० वर्षात ३० वृत्तपत्र किंवा वाहिन्यांच्या कार्यालया वर हल्ले झाले आहेत.१० वर्षात ७६२ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत आणि या पैकी एकाही प्रकरणातील आरोपीला शिक्षा झालेली नाही.
मेऴाव्यास मराठवाड्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने ऊपस्थित राहावे असे आवाहन समितीचे निमंत्रक  एस.एम.देशमुख यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments