पत्रकार कांचन देशपांडे यांचे निधन

भंडारा - भंडारा आणि गोंदिया जिल्हयाचे झी 24 तास या चॅनलचे प्रतिनिधी  कांचन देशपांडे यांचे नागपूर येथे 1 नोव्हेंबर रोजी खाजगी इस्पीतळात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्युसमयी ते 42 वर्षाचे होते.
यवतमाळ जिल्हयातील वणी येथील रहिवासी असलेले श्री. देशपांडे यांनी भंडारा येथे तरुण भारत या वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी, ईटीव्ही चे प्रतिनिधी म्हणून काम केले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रसार माध्यमाच्या क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, भाऊ व आई-वडील आहेत.
    आज नागपूर येथे सहकारनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा चिन्मय यांनी अग्नी दिला. यावेळी माहिती संचालक भि. म. कौसल, माहिती विभागातील अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, नातलग व मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होता.

स्व. कांचन देशपांडे यांना आदरांजली
 भंडारा - भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघ व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त वतीने  स्व. कांचन देशपांडे  यांना आज (ता.2) आदरांजली वाहण्यात आली. पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमात पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांच्या अध्यक्षतेखाली आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माहिती अधिकारी विवेक खडसे, पत्रकार संघाचे सचिव मिलींद हळवे, कोषाध्यक्ष डी.एफ. कोचे, पत्रकार सर्वश्री. गोपू पिंपळापूरे, नंदकिशोर परसावार, काशिनाथ ढोमणे, प्रमोद नागदेवे, दिपक फुलबांधे, दिपक रोहणकर, संजीव जयस्वाल, सुरेश शेंडे, पृथ्वीराज बन्सोड, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी सर्वश्री. माणिक कन्हाके, घनशाम खडसे,   घनशाम सपाटे यांची उपस्थिती होती. स्व. कांचन देशपांडे यांनी दैनिक तरुण भारत चे जिल्हा प्रतिनिधी, ई-टी.व्ही. चे प्रतिनिधी म्हणून काम केले होते. सध्या ते झी 24 तास या चॅनलचे भं डारा- गोंदिया प्रतिनिधी  म्हणून कार्यरत होते.   मनमिळावू स्वभाव व सहकार्याची वृत्ती असलेले पत्रकार म्हणून ते ओळखले जात.  आयोजित कार्यक्रमात त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

Post a Comment

0 Comments