औरंगाबादेत २६ तारखेपासून सुरु होत असलेल्या वेरूळ महोत्सवासाठी समितीने पत्रकारांसाठी १००० पासेस राखीव ठेवल्याची गुप्त बातमी उघड झाल्याने काही अधिकारी संतप्त झाले आहेत. आपल्या 'मर्जी'तील पत्रकारांना झुकते माप देण्याचा त्यांचा उद्देश सफल होणार नाही असे दिसताच त्यांनी ताणतण करण्यास सुरवात केली. रेल्वे स्टेशन रोड वरील आपल्या कार्यालयात बसून मर्जीतील सर्व पत्रकारांना पासेस देऊन उरलेले पासेस इतरांना माहिती कार्यालयामार्फत वाटप करायचे त्यांचे मनसुबे बेरक्यामुळे उधळले गेले आहेत.
दैनिकांच्या वितरणामाणे पासेसची संख्या ठरविन्यात येत असून लोकमतला सर्वाधिक पासेस मिळणार आहेत. विशेष म्हणजे, या वर्षी मराठवाड्यातील सर्व जिल्हा ठिकाणी असणाऱ्या दैनिकांच्या संपादकांनासुद्धा विशेष व्यवस्था करून बोलावण्यात येणार आहे! विभागातील आणि शहरातील मिडीयाला अशा प्रकारे खुश करताना राज्य पातळीवर प्रसिद्धीसाठी समिती साडेपाच लाख रुपये खर्चणार असल्याचे कळते. यामध्ये बाहेरील पत्रकारांचे पंच तारांकित वास्त्यव्य समाविष्ट आहे.
मात्र, महोत्सव दोन दिवसांवर आला असून सुद्धा अजून पासेस आले नसल्याने पत्रकार बेचैन आहेत. हे असेच चालू राहिले तर आपण सह कुटुंब येण्याचे नियोजन कसे करू शकू, असा त्यांचा सवाल आहे. समितीने या साठी खूप उशीर केल्यास वर्तन्कानावर बहिष्कार टाकण्याचा विचार काही जन बोलून दाखवीत आहेत.
0 टिप्पण्या