प्रशांत ठाकूर यांनी आणले सकाळला गोत्यात

पनवेल - खोटे बोलण्याची ख्याती असलेल्या प्रशांत ठाकूर यांनी आपल्या खोटेपणामुळे सकाळ या दैनिकाला गोत्यात आणले आहे. बातमीची सत्यता पडताळून न पाहता संपादकीय जबाबदारीची जाणिव नसलेल्या पद्मभूषण देशपांडे यांनी प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास ठेवून सकाळमधून खोटे आणि चुकीचे वृत्त प्रसिद्ध केल्याबद्दल आमदार विवेक पाटील यांनी सकाळचे समूह संपादक उत्तम कांबळे, मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे आणि प्रशांत ठाकूर यांच्यावर 10 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याची नोटीस पाठवली आहे.
केवळ नावाचे साधर्म्याचा गैरफायदा उठवत प्रशांत ठाकूर यांनी कर्नाळा इन्फ्राप्रोजे्नटच्या माध्यमातून आमदार विवेक पाटील यांनी अवैध बांधकाम केल्याचे आपल्या भाषणातून बोलून दाखवले होते. त्याची कसलीही खातरजमा न करता सकाळने ते वृत्त छापले होते. वास्तविक पाहता ज्या कर्नाळा इन्फाप्रोजे्नटचा सकाळने उल्लेख केलेला आहे त्याच्याशी आमदार विवेक पाटील यांचा कसलाही संबंध नाही. ती कंपनी आमदार विवेक पाटील यांची नाही, किंवा त्यांचे कोणाही नातेवाईकाचीही ती कंपनी नाही. हे माहित असुनही केवळ कर्नाळा नाव दिसले म्हणून प्रशांत ठाकूर यांनी हेतुपुरस्सर निवडणुकीच्या काळात गैरसमज परसवण्याच्या दुष्ट हेतुने हे वृत्त सकाळमधून प्रसारीत करून आणले. विशेष म्हणजे ठाकूर पितापुत्रांच्या मालकीचे रामप्रहर नावाचे दैनिक आहे. या दैनिकातून ते नेहमीच खोट्या आणि चुकीच्या बातम्या छापत असतात. पण ही बातमी आपल्या पेपरात न छापता सकाळच्या नावाचा दुरूपयोग करून सकाळला अडचणीत आणले आहे. कोणतेही वृत्त छापताना त्याची सत्यासत्यता तपासून पाहणे गरजेचे आहे याचे भान पद्मभूषण देशपांडे यांनी न ठेवल्याने आमदार विवेक पाटील यांनी सकाळ विरोधात अब्रू नुकसानीचा दहा कोटींचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केलेले आहे. त्यासबंधीची नोटीस शनिवारी सकाळला देण्यात आलेली आहे.चुकीचे वृत्त छापण्याबद्दल सकाळला नुकतीच पुढारी या वर्तमानपत्राची माफी मागण्याची नामुष्की ओढवली होती. सकाळच्या इतिहासात ही पहिलीच घटना ताजी असताना पुन्हा एकदा सकाळला अशी माफी मागण्याची वेळ प्रशांत ठाकूर यांनी आणल्यामुळे सकाळ वृत्तसमुहात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

0 Comments