मुंबई - ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय तथा जे. डे यांच्या हत्येची माहिती पत्रकार जिग्ना व्होराला होती. डे यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज विशेष न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात तसा उल्लेख केला आहे. पत्रकार डे आणि जिग्ना यांच्यातील वैमनस्याला छोटा राजनचा विश्वासू साथीदार फरीद तनाशा कारणीभूत समजला जात असला, तरी अद्याप या हत्येमागील उद्देश पोलिसांनी स्पष्ट केलेला नाही.
जिग्नाने छोटा राजनला ई-मेलवरून डे यांच्या मोटरसायकलचा क्रमांक आणि कार्यालयाचा पत्ता कळविला होता; याशिवाय डे यांनी छोटा राजनबद्दल लिहिलेल्या कथित बदनामीकारक बातम्यांच्या "लिंक' पाठविल्या होत्या. डे यांच्या हत्येचा कट 2010 मध्येच रचण्यात आला होता. मार्च 2011 मध्ये छोटा राजनने जोसेफ पॉल्सन याला ग्लोबल सिमकार्ड खरेदी करण्यासाठी 2 लाख रुपये दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. डे गेल्या वर्षी 28 एप्रिल ते 6 मे या काळात लंडनमध्ये होते; त्यांनी छोटा राजनला तेथे बोलावून घेतले होते; मात्र तेथे सापळा रचून आपली हत्या करण्याचा कट असल्याच्या संशयावरून राजन डे यांना लंडनमध्ये भेटला नव्हता.
डे यांच्या हत्येपूर्वी पॉल्सनच्या माध्यमातून जिग्ना व्होरा छोटा राजनच्या संपर्कात होती. सुरुवातीला दिवसाला सहा-सात फोन करणारी जिग्ना नंतरच्या काळात दिवसाला 20 ते 25 वेळा पॉल्सनशी आणि त्याच्या मध्यस्थीने छोटा राजनशी बोलत होती. तिने स्वत:च्या मोबाईलवरून 36 वेळा छोटा राजनशी संपर्क साधल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. डे यांच्या हत्येपूर्वी 9 जूनला जिग्ना सिक्कीम आणि दार्जिलिंग येथे गेली होती. ती 18 जूनला मुंबईत परतली; त्या काळात जिग्नाने स्वतःचा मोबाईल वापरला नव्हता. डे यांची हत्या 11 जूनला झाली, त्याबाबत तिने विचारपूससुद्धा केली नव्हती.
सबळ पुरावे उपलब्ध
जे. डे यांच्या हत्येनंतर छोटा राजनने काही पत्रकारांशी बोलताना; तसेच त्याच्या हस्तकांसोबत मोबाईलवरून संवाद साधताना जिग्नाचे नाव घेतले होते; त्याचाच गुन्हे शाखा पुरावा म्हणून वापर करणार आहे. छोटा राजनच्या आवाजाचे नमुनेही पोलिसांकडे असल्याने ते महत्त्वाचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जातील; मात्र पोलिस केवळ छोटा राजनच्या बोलण्यावर अवलंबून राहणार नाहीत. उपलब्ध असलेले पुरावे तिला या गुन्ह्यात शिक्षेपर्यंत पोचविण्यास सक्षम असल्याचेही गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले; मात्र छोटा राजन आणि जिग्ना व्होरा यांच्यातील संभाषण पोलिसांकडे नसल्याचे ते म्हणाले.
दीड हजार पाने; 27 साक्षीदार
"मिड-डे'चे गुन्हे पत्रकार जे. डे यांच्या हत्येत पत्रकार जिग्ना व्होरा हिचा सहभाग स्पष्ट झाल्यावर गुन्हे शाखेने तिला गेल्या नोव्हेंबरमध्ये अटक केली होती. या गुन्ह्यातील तिच्या सहभागाबाबत गुन्हे शाखेने सखोल तपास करून न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. तब्बल 1471 पानांचे हे पुरवणी आरोपपत्र तीन भागांत आहे. त्यात साक्षीदारांचे जबाब, मोबाईल फोन, ई-मेल आणि "कॉल डिटेल्स रेकॉर्ड'; तसेच न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेने दिलेल्या अन्य पुराव्यांचा समावेश आहे. पोलिसांनी घेतलेल्या 27 साक्षीदारांच्या जबाबांना 155 पाने लागली आहेत; त्याशिवाय 164 कलमाखाली न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे तीन आरोपींनी दिलेले कबुलीजबाबही पोलिसांकडे आहेत. जप्त केलेले आठ मोबाईल फोन, सिमकार्ड, लॅपटॉप यासंबंधीचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे.

0 टिप्पण्या