आणखी दोन पत्रकार शिकार

श्रीरामपूरची घटना ताजी असतानाच गेल्या दोन दिवसात   पत्रकारांच्या मारहाणीच्या आणि दमदाटीच्या दोन घटना घडल्य़ा आहेत.पहिली घटना आहे,लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील.तेथील 65 वर्षोंचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांच्या डोळ्यात तिखटाची पूड  टाकून तीन आरोपींनी  त्यांचे अपहरण केले.गावाच्या  बाहेर नेऊन त्यांना मारहाण केली गेली.बेदम मारहाण केल्यानंतर त्यांना तेथेच टाकून आरोपी पसार झाले.तीन आरोपीत एक महिला आरोपी होती.सुरेश पाटील पोलिसात जाण्यापूर्वीच आरोपी पोलिस ठाण्यात गेले आणि सुरेश पाटील यांच्यविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेला.सुरेश पाटील यांच्या तक्रीरीची दखल घेतली गेली नाही.
 दुसरी घटना आज शुक्रवारची.नांदेडची.तेथील देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी अनिल कसबे यांनी आजच्या अंकात जिल्हा पऱिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीची बातमी छापली.त्या बातमीमुळे संतप्त झालेल्या खा. सुभाष वानखेडे यांनी कसबे यांना फोन करून तुला जिवंत जाळून टाकील आणि तुझे कार्यालयही जाळून टाकलं जाईल अशी धमकी देत अर्वाच्च शिविगाळ केली.
 माहूर येथील किमान 10-12 पत्रकारांवर खंडणी,विनयभंग,जातीयवादी शिविगाळीचे खोटे गुन्हे दाखल केले गेले आहेत.

Post a Comment

0 Comments