सोलापूर - सोलापूरच्या पुढारी कार्यालयात 3 ते 4 डी.टी.पी.ऑपरेटर आहेत. ते अत्यंत तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत.अनेकवेळा काम करूनही त्यांना पगारवाढ मिळाली नाही.शेवटी कंटाळलेले सर्वच्या सर्व डी.टी.पी.ऑपरेटर काल दि.19 फेब्रुवारी रोजी दिव्य मराठीच्या मुलाखतीला गेले होते.त्यामुळे शांताप्पापासून सर्वच उपसंपादकांची गोची झाली.
माय सोलापूरची पाने आता कशी भरणार, असा प्रश्न त्यांना पडला.सर्व ऑपरेटर साडेपाचपर्यंत कार्यालयाकडे फिरकले नाहीत.शेवटी त्यांच्या हाता-पाया पडून बोलाविण्यात आले, परंतु सोलापूरची डेडलाईन संपली तरी पाने गेली नाहीत.ही बाब पद्मश्रींच्या कानावर गेली.त्यांनी सर्व ऑपरेटरना थांबविण्याचा आदेश दिला.परंतु दिव्य मराठी जर पुढारीपेक्षा दुप्पट - तिप्पट पगार देत असले तर कसे थांबणार, असे त्यांना सांगण्यात आले.दोन दिवसांत निर्णय सांगतो, म्हणून पद्मश्रींनी त्यांना शब्द दिला आहे...आता पद्मश्रींच्या शब्दावर विश्वास ठेवून, हे डी.टी.पी.ऑपरेटर थांबणार की, दिव्य मराठीत जाणे पसंद करणार, हे आगामी काळातच कळेल.

0 टिप्पण्या