भैय्यागिरीमुळे औरंगाबाद लोकमतला उतरती कळा ! मोठ्या भूकंपाची शक्यता

मराठवाड्यात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न,त्यांची वाचनाची भूक भागविण्यासाठी सुरु झालेला दैनिक मराठवाडा हा 90 च्या दशकात मावळतीला जाण्यास सुरुवात झाली.  नागपूरहून आलेले अमराठी दर्डाजि यांचा मराठी बद्दलचा अभिमान,तळमळ व मराठवाड्याच्या मनाचा अचूक ठाव, आधुनिक तंत्रज्ञान, माणसे जोडण्याची कला, कुटुंब भावना आणि अथक परिश्रमातून उभा केलेला लोकमत बघताबघता मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्राचा आत्मा बनला. हे शिखर गाठतांना त्यांच्या खांद्याला खांदा देऊन उभा राहिला तो येथील मराठी माणूस.  राजेंद्र दर्डा यांनी अमराठी असुन् सुद्धा मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवून लोकमतच्या माध्यमातून अधिराज्य गाजविले व दर्डाजींनी मराठी माणसांवर टाकलेला विश्वास बघून  वाचकांनी देखील त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले.दर्डाजींनीही  मराठी माणसे  बाबा दळवी, संतोष महाजन, महावीर जोंधळे, सुभाषचंद्र वाघोलीकर, चक्रधर दळवी अशा मराठवाड्यातील मराठी भाषिक संपादकांच्या हातात लोकमतची जवाबदारी सोपवली. प्रशासकीय कारभार करताना देखील एस.एल.देशमुख, मुळे, आवारी, टीआर  जाधव,   सोनदे,जानराव, महाजन, जैन,जाधव, पाटील, देशमुक आदी  बहुजन समाजातील मराठी अधिकाऱ्यांना सर्वाधिकार दिले आणि त्यांनीदेखील लोकमतचा झेंडा अबाधित ठेवला. ओमप्रकाश केला हे देखील अमराठी होते मात्र ३५ वर्षापासून मराठवाडा भागात काम केल्याने त्यांनी ती उणीव भरून काढली.दरम्यान सकाळ, दीव्य मराठी, मटा, पुण्यनगरी, पुढारी, अशे एकामागून एक असंख्य वार लोकमत वर  झाले परंतु दर्डाजींनी उभा केलेल्या कर्मच्यार्यांची  सेना, एजंट  नेटवर्क, जाणकार वार्ताहर  टीम,जाहिरातदारांचा पाठींबा  आणि वाचकांचे लोकमत वरील प्रेम यामुळे लोकमत च्या भिंतीला भेदू शकले नाही. बरीच चर्चा झाली परंतु सर्वमान्य लोकमत शेवटी लोकमतच ठरला कारण मराठी मनाचा ठाव पर राज्यातील भय्यांचे दैनिक घेऊ शकले नाही.   लोकमतचा मराठवाडा होईल हे जरी  वरील परीस्तीतीत  शक्य झाले नाही परंतु पुढील परिस्थितीला दर्डाजींनी वेळीच आवर घातला नाही तर काळ साक्षीला आहे लोकमतची रातोरात अधोगती अटळ आहे. कोणतेही वर्तमानपत्र लोकमतला रोखू शकले नाही आणि रोखणार अशी नाळ त्यांना सापडलेली नाही. त्यामुळे लोकमतची अधोगती हि कोणत्याही वर्तमानपत्रामुळे होणार नसून ती फक्त लोकमत मधील सध्याच्या  भय्यागीरीमुळेच होणार आहे. औरंगाबाद लोकमत मध्ये सध्या भय्यागीरीने जोरदार जाळे पसरले असूनहि उत्तर भारतीय मंडळी राजेंद्र दर्डा व त्यांच्या दोन्ही मुलांची दिशाभूल करून  मनमानी कारभार करीत आहे. यात ३० वर्षात रक्ताचे पाणी करून लोकमत साठी  झगडलेल्या मराठी कर्मचारी,एजंट, वार्ताहर, यांनाच वेड्यात काढून नियोजन बद्ध  खच्चीकरण  करून त्यांना सोडून जाण्यास मजबूर करून जास्तीत जास्त भय्यांचा भरणा करण्याचा कट चालू आहे. दर्डा जींनी आता हे षड्यंत्र वेळीच रोखून मराठी मनाचा ठाव घेण्यासाठी-जोडण्यासाठी भय्यांची फौज नाही तर मराठी माणसांचीच सेना लागते याचे भान ठेवावे. लोकमतने ३० वर्षात जपलेले वाचक-विक्रेता-वार्ताहर व लोकमत कार्यालय असे परिवाराचे नाते विविध प्रांतातून आलेली  भय्या मंडळी संपून टाकत असून या  भय्यागीरीमुळे औरंगाबाद लोकमतमध्ये लवकरच पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वात  मोठा भूकम्प होणार आहे. गेल्या ४-५ वर्षापासून राजेंद्र दर्डा राजकारणात अति  व्यस्त झाले
असल्याने लोकमतची जवाबदारी त्यांची दोन मुले रिशी दर्डा व करण दर्डा बघतात. या दोघांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल सुरु केली आणित्याच मराठी माणसांना सोबत घेऊन लोकमतचा डोलारा वाढवला  त्यात ते यशस्वीदेखील झाले.मात्र लोकमतला  कॉर्पोरेट लूक देण्याच्या नावाखालीगेल्या काही दिवसांपासून परप्रांतीय बेअक्कल व बेकामी   भय्यांचा जो गोंधळ, शिरकाव, लॉबी आणि भरती   सुरु आहे ती  लोकमतला घेऊनच  डुबेल कारण मालकांची दिशाभूल करण्याच्या घाणेरड्या  राजकारणात मराठी माणूस नक्कीच कमी पडेल त्याला चापलुसी पेक्षा कामातच रस आहे. 
लोकमत मध्ये मराठी अधिकाऱ्यांना बाजूला करून रिशी व करण दर्डा यांनी उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश मधील आयात केलेली व मराठी मनाची,  मराठवाड्याची काडीची माहिती नसलेल्या लोकांच्या हाती लोकमतची सूत्रे देत आहेत. मुख्य व्यवस्थापक व सूत्रधार राजू  अग्रवाल, श्रीवास्तव, मिश्रा,रस्तोगी,बाजपेयी,पारेख, शर्मा-वर्मा, गुप्त,मिश्रा,त्रिवेदी, इटप,द्विवेदी  आदी बोलबचन  भय्या मंडळी लोकमतचा कारभार पहात  आहेत. यांच्या जोडीला लोकमत समाचार सोडून गेलेला  व नंतर भास्करचा व भय्यांचा खास खबऱ्या  म्हणून परत आलेला
चामचेबाहाद्दार  अमिताभ श्रीवास्तव आहे. या   सगळ्या खेळी मुळे  येथील मराठी माणूस चमचेगिरी जमत नसल्याने असुरक्षिततेच्या भावनेतून एकेकाळी लोकमतच्या विकासासाठी झटणारा कामगार भय्यागीरीला शह देण्यासाठी  आता  नाविलाजाने  येथील बोथट झालेली कामगार युनियन सक्रीय करणे,  [ जिचा कधी दर्डाजिंमुळे आधार घ्यावा लागला नाही]
सामुहिक राजीनामे देणे, पक्ष-संघटनाचा आधार घेणे आदी मार्गांचा अवलंब करण्याची   चर्चा- कुजबुज लोकमत परिसरात सुरु आहे.याची महाराष्ट्राच्या समस्या सोडविणारे दर्डाजि यांनी वेळीच दाखल घेऊन पावले उचलली नाहीत तर त्यांना घरातील भूकंपाचा धक्का बसेल यात दुमत नाही. याची थोडी प्रचीती असेल तर आपल्या जवळच्या  विश्वासुंना याची शहानिशा करावी मात्र सध्या जे लोकमतमध्ये सुरु आहे ते काही दिवस असेच सुरु राहिले तर ३० वर्षात उभा राहिलेला हा डोलारा कोसळण्यास वेळ लागणार नाही. राजेन्द्र दर्डा यांना वेळ  नाही ते मंत्रिपदात मश्गुल आहेत मात्र भय्या मंडळींना वेळीच  आवर घातला नाही तर ज्या लोकमतच्या भरवशावर आमदारकी व मंत्रिपद मिळवले तो लोकमत रसातळाला गेलेला दिसेल. केवळ आम्हीच अक्कलवान आहोत इतर सर्वजण मूर्ख आहेत व आम्ही यांना अक्कल शिकवायला आलो आहोत अशा अविर्भावातभय्या कंपनी  वागत आहेत.परंतु त्यांनी हे समजून घ्यावे कि लोकमत शिखरावर गेला तो मराठी माणूस व मराठी वाचकांमुळे, बेअक्कल  भय्यांमुळे नव्हे.
विराधी दैनिकांना जम बसविण्यासाठी भय्यांनी घेतलेली सुपारी दर्डा पिता -पुत्रांना बहुदा समजलेली नाही.लोकमतमध्ये जे चाललय त्याच्याकडे गांभीर्याने बघायला दर्डा पिता-पुत्रांना वेळ नाही. भय्या मंडळी सांगतील तेवढेच ऐकायचे हा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. या मुळे लोकमतचा गाडा बेअक्कल उत्तर भारतीयांच्या इशाऱ्यावर चालू आहे. मराठवाडा विभागातील दूरवर पसरलेला वाचकवर्ग वार्ताहर,एजंट यांचे मजबुतपणे विणलेले जाळे.लोकमतने निर्माण केलेले  मराठवाडा विभागातील विविध चळवळीचे व्यासपीठ, ३० वर्षात जोडले गेलेले भावनिक नाते याच्या जोरावर लोकमतने एकछत्री राज्य केले ते भय्यागीरीमुळे नव्हे तर या मातीतल्या जीवाभावांच्या लोकांमुळे. केवळ पैसा असल्याने दैनिक चालले असते तर विलासराव देशमुखांचा एकमत, कदमांचा लोकपत्र, पवारांचा सकाळ मागे पडले नसते हे दर्डा पिता-पुत्रांना समजून सांगण्याची गरज नाही.भय्यागीरीमुळे त्रस्त झालेल्या मराठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी  केवळ पगारीपुरते काम केले तर लोकमतचा एकमत किंवा लोकपत्र व्हायला वेळ लागणार नाही. मराठी अधिकारी-कर्मचारी यांची भय्या लोकांकडून अशीच गळचेपी होत  राहिली तर लोकमतमध्ये लवकरच प्रचंड भूकंप होणार ,हे निश्चित.

Post a Comment

0 Comments