औरंगाबाद - मराठी प्रसारमाध्यमांना उपयोगाची ठरेल, अशा संस्थेची उभारणी औरंगाबादेत करण्यात आली असून, मिडिया प्लस नावाने ही संस्था प्रसारमाध्यमांच्या सेवेत १ फेब्रुवारीपासून रूजू झाली आहे. वृत्तपत्रांना लागणारा सर्व प्रकारचा मजकूर आणि आकर्षक व दर्जेदार पाने पुरविण्याची मोहीम पहिल्या टप्प्यात संस्थेतर्फे हाती घेण्यात आली असून, प्रायोगिक तत्त्वावर २५ दैनिकांना वृत्त सेवा आणि सहा दैनिकांना फिचर्स पाने सध्या पुरविली जात आहेत, अशी माहिती मिडिया प्लसच्या कार्यकारी संचालिका श्वेता पाटील यांनी दिली.
अत्यंत अल्पदरात दर्जेदार सेवा देणारी संस्था म्हणून मिडिया प्लस नावलौकिक प्राप्त करेल, अशी आशा संस्थेच्या संचालिकांनी व्यक्त केली आहे. संस्थेतर्फे सध्या पुरविली आठवड्याच्या सातही दिवस वेगवेगळ्या विषयांवरील पाने पुरविली जातात. यात दर रविवारी आठवड्यातील प्रमुख, महत्त्वाच्या राजकीय-सामाजिक घडामोडींचा उहापोह करणारे पान, सोमवारी आध्यात्मिक, मंगळवारी जगातील अद्भूत अशा घडामोडींचे पान, बुधवारी महिला पान, गुरुवारी आरोग्य पान, शुक्रवारी विज्ञान विषयक घडामोडींचे पान, शनिवारी चित्रपटविषयक पान पुरविले जाते. वृत्त सेवेतही मोठी भरारी घेताना मिडिया प्लसने रोज शंभर बातम्या दैनिकांचे कसब पूर्ण केले आहे. मराठवाड्यातील प्रमुख घडामोडींसह राज्य, देश, विदेश आणि स्पोट्र्स, वाणिज्य सर्व प्रकारच्या बातम्या वृत्त सेवेत पुरविल्या जातात. याशिवाय दैनिक शब्दकोडे, राशिभविष्य, दिनविशेष ही सदरांचाही त्यात समावेश आहे. महिन्यासाठी वृत्तसेवेचे पॅकेज केवळ एक हजार रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी फेसबुकवरील मिडिया प्लसच्या http://www.facebook.com/ profile.php?id=100003528605310 या पेजला भेट द्यावी.
मिडिया प्लसमध्ये लवकरच लोकमतचे दोन माजी, एक आजी पत्रकार मिडिया प्लसमध्ये १ एप्रिलपासून आणखी तीन अनुभवी पत्रकारांचा समावेश होणार आहे. त्यात लोकमतचे दोन माजी अनुभवी पत्रकार आणि औरंगाबाद कार्यालयातील एक आजी पत्रकार मिडिया प्लसमध्ये दाखल होणार आहेत. तिघेही मिडिया प्लसचे सल्लागार संचालक म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत. याशिवाय प्रत्यक्ष कामकाजातही ते सहभागी होणार आहेत. त्यांच्या आगमनामुळे मिडिया प्लसमध्ये अधिकाधिक दर्जेदार सेवा पुरवू शकेल, असा विश्वास श्वेता पाटील यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या