पिंपरी - पिंपरी-चिंचवड महिला पत्रकार संघाची शुक्रवारी (ता.16) स्थापना करण्यात आली. अध्यक्षपदी महाराष्ट्र टाईम्सच्या सीमा शेख तर कार्याध्यक्षपदी साप्ताहिक 'सखी माझी सोबती'च्या सायली कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.
पिंपरी येथे पत्रकार आणि पत्रकारेत्तर महिलांची बैठक झाली. यामध्ये मार्च 2012 ते मार्च 2013 या एक वर्षासाठी अकराजणींची कार्यकारिणी निवडण्यात आली.
प्रसिध्दी माध्यमांमध्ये काम करणा-या महिलांचे संघटन, सक्षमीकरणासाठी हा संघ कार्यरत राहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षा शेख यांनी सांगितले.
उपाध्यक्षपदी 'माय पिंपरी-चिंचवड डॉट कॉम'च्या निशा पाटील, 'लोकमत'च्या संगीता तरडे यांची तर खजिनदारपदी 'प्रभात'च्या मनिषा जोशी यांची निवड करण्यात आली.
इतर कार्यकारिणी सदस्यांमध्ये संगीता कांबळे (सकाळ), अर्चना दहिवाल (डीएनए), अश्विनी सांबरेकर (आज का आनंद), विजेता गवस (पुढारी), स्मिता जोशी (पिंपरी-चिंचवड अंतरंग), रजनी पानसरे (पुण्यनगरी) यांचा समावेश आहे.

0 टिप्पण्या