म टा परत एकदा अकलेचा बोभाटा

आजच्या महाराष्ट्र टाइम्स ने परत एकदा आपल्या अकलेचा बोभाटा सिद्ध केला आहे. राज्यपाल के. शंकर नारायण यांच्या हस्ते वेरुळच्या लेण्यांची छायाचित्रे आणि चित्रे असलेल्या प्रदर्शनाची उद्घाटन करण्यात आले. ही बातमी देताना (औरंगबाद महाराष्ट्र टाइम्स शनिवार २४ मार्च २०१२, पृष्ठ क्र. २) मथळा मात्र वेरूळची रेखाटने असा देण्यात आला आहे. वार्ताहर विजय चौधरी यांना किंवा हा मथळा देणारे औरंगाबादच्या संपादकीय विभागातील महान पत्रकार यांना कोणालाच चित्र, छायाचित्र आणि रेखाटन यांतला फरक कळत नाही काय?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या