एक गंमत पाहा ... इशू सिंधू हा जळगावातील जबरदस्त पोलीस अधिकारी .. त्याने सुरेश जैन यांच्या मुसक्या आवळल्या. जळगाव शहरातील त्यांची दादागिरी संपुष्टात आणली. टाईम्स ऑफ इंडियानेही लेख लिहून या कामगिरीला सलाम केला. या अधिकारयाला खरे बळ दिले ते 'दिव्य मराठी'ने. इशू सिंधू, घरकुल घोटाळा पावल्याने जळगावात 'दिव्य' घडले; 10 हजाराने सर्क्युलेशन वाढून पेपरचा खप ५० हजारावर पोहोचला. मात्र, गुढीपाडव्याला गंमत झाली. इशू सिंधू यांची संघर्षातून विजयाची कथा औरंगाबाद 'दिव्य मराठी'त पहिल्या पानावर ठळकपणे छापून आली. जळगावात मात्र त्याचा पत्ताच नाही. कोण कुणाला MANAGE झाले ते देवालाच ठावूक; पण हा चमत्कार झालाय. ज्या शहराची बातमी त्या शहरालाच नाही. शिवाय गेला आठवडाभरात तीन वेळा संपादक आणखी एका ज्येष्ठ पत्रकाराला घेउन जैन हिल्सची पायरी चढून आले. नंबर एक पेपरचा संपादक कशाला जैनांच्या पायरया झिजवतोय? इथे काही 'पुण्यनगरी'सारखी पेड न्यूज, जाहिराती गोळा करण्याची सक्ती नाही. दिमतीला इतके वार्ताहर आहेत, त्यांना पाठवावे फिल्डवर; स्वत: का उंबरे झिझवावेत? असेही कळतेय की, भंवरलाल आणि अशोक जैन वैगेरे १२-१५ जणांविरुद्ध कोर्टाने बळजबरीने जमीन बळकावल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. हीही बातमी 'दिव्य मराठी' ने दाबली. एमजे कॉलेजने विनापरवानगी मजले चढविले. ज्या इमारतीला महापालिकेने परवानगी दिलेली नाही, बांधकाम पूर्णत्त्वाचा दाखला दिलेला नाही; अशा बेकायदेशीर इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती करताहेत. हीही बातमी 'दिव्य'च्या एका वार्ताहराने दिली होती. तीही दाबली गेली. आश्चर्य म्हणजे ही बातमी दाबणारया चीफ रिपोर्टरच्या मुलाला एमजे कॉलेजच्याच नर्सरीत फुकटात, डोनेशन न घेता प्रवेश दिला गेला. तोही नेमका याच काळात. बातमी आलीच नाही; मुलाचा फुकटात प्रवेश झाला. किती अजब योगायोग? बरे एव्हढे सारे करून पूर्ण पान जाहिरात एमजेवाल्यांनी दिली ती 'लोकमत'ला! सांगा ही कुठली नि:पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता? ही तर 'पुण्यनगरी'छाप पत्रकारिता सुरु आहे. त्यामुळेच पुण्याहून, मुंबईहून आलेल्या अनेक चांगल्या माणसांचा 'दिव्य जळगाव'मध्ये दम घुटतोय. हे जे सारे काही 'पुण्यनगरी'छाप चाललेय त्या चीप गोष्टींना या मंडळीचा विरोध आहे; पण त्यांना मोजतोय कोण? जळगावात सारे काही 'दिव्य'सुरु आहे हेच खरे!
0 टिप्पण्या