थोरले दर्डा शेठजी आणि अमरावतीतील काही ब्राह्मण पत्रकारांनी एकत्र येऊन सुनियोजितपणे अविनाश दुधे यांचा बळी घेतल्याची बाब आता समोर आली आहे. बहुजन समाजातील ताकदीने लिखाण करणारया पत्रकारांना याअगोदरही अशाच प्रकारे संपविण्यात आले आहे. 'चित्रलेखा' सारख्या महाराष्ट्रातील क्रमांक एकाच्या साप्ताहिकाचे विदर्भ ब्युरो चीफ असलेल्या आणि तिथे कायमस्वरूपी नोकरीत असलेल्या अविनाश दुधेंना स्वत: विजय दर्डा यांनी 'लोकमत' मध्ये आणले होते. तेव्हा चित्रलेखाचा राजीनामा दुधेंनी पाठविला तेव्हा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महारावांनी त्यांना सावध केले होते ' लोकमत मध्ये जाता खरे, पण एक दिवस तुम्हाला याचा पश्चाताप होईल.' महारावांचे तेव्हाचे शब्द आज खरे ठरले. २००१ मध्ये अविनाश दुधे लोकमतला रुजू झाले तेव्हापासून यवतमाळ, अमरावती, अकोला येथे काम करताना दुधे यांनी अनेक वेगवेगळे विषय हाताळून विदर्भाच्या पत्रकारितेत स्वतःचे असे एक स्थान तयार केले . पुरोगामी विचार, वेगवेगळ्या चळवळीना ताकद देण्याची त्यांची भूमिका, अतिशय परखड लिखाण आणि सोप्या लेखनशैलीमुळे विदर्भात त्यांनी स्वतःचा वाचकवर्ग तयार केला. अमरावतीतील त्यांची कारकीर्द विशेष गाजली . येथे त्यांचे 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वाच' ही पुस्तक प्रकाशित झाली . 'मीडिया वाच' नावाचा दर रविवारी प्रकाशित होणारा त्यांचा कालम अतिशय वाचकप्रिय होता. दुधेंच्या या लिखाणाचा लोकमत ला भरपूर फायदा झाला . कधी नव्हे ती विश्वासाहर्ता त्यांनी मिळाली. अनेक चळवळीतील कार्यकर्ते दुधेंमुळे लोकमतला आपल दैनिक मानायला लागले . मात्र दर्डा शेठ च पोट इथेच दुखायला लागलं' आपला माणूस एवढा लोकप्रिय होतो म्हणजे काय, लोकमत च्या प्रथेप्रमाणे त्यांनी दुधेंचे पंख छाटण्याची तयारी सुरु केली . त्यांना अकोला येथे बढती देऊन संपादकीय प्रमुख म्हणून पाठविण्यात आले. म्हणायला बढती होती पण खर कारण वेगळंच होत. इंडिया बुल या कंपनीच्या अमरावतीत होऊ घातलेल्या वीज प्रकल्पाविरुद्ध दुधे यांनी अतिशय ताकतीने जनजागरण चालविले होते, बी टी देशमुख, बच्चू कडू, प्रभाकरराव देशमुख या सारख्या सचोटीच्या माणसांना दुधे ताकद देत होते. हेच दर्डा सेठला नको होते . त्यामुळे बढती दिल्याच कारण समोर करून त्यंना अमरावतीतून हलविल . यातून त्यांनी एका दगडात दोन पक्षि मारले. अविनाश दुधे ला तिथे पाठविताना गजानन जानभोर या बहुजन समाजातील दुसऱ्या पत्रकाराला हतोत्साहित करण्यात आले होते .
दुधेविरुद्ध आता दाखल झालेला सायबर गुन्हा हा इंडिया बुल कंपनीविरुद्ध त्यांनी जो लढा दिला त्याच्याशी निगडीत आहे. जेव्हा दुधे अमरावतीतील वीज प्रकल्पाविरुद्ध जोरकसपणे लिखाण करत होते तेव्हा विजय दर्डा यांचे अमरावतीतील खासमखास मानले जाणारे हिंदुस्तान या दैनिकाचे प्रबंध संपादक विलास मराठे यांनी दुधे यांच्याशी संपर्क करून तुमचे लेख मला द्या. मला पुस्तिका काढायची आहे . कंपनीविरुद्ध जनजागरण करायचे आहे, असे सांगितले .दुधेंनी त्यांना लेख दिले. मराठे आणि त्यांचा मित्र पप्पू पाटील यांनी इंडिया बुल विरुद्ध विदिओ रथ ही काढला . कालांतराने या दोघांची ही धडपड पैशे खाण्यासाठी होती हे संपूर्ण अमरावती च्या लक्षात आले. मराठेंनी 'अंबा महोत्सव' या नवरात्रीतील उत्सवासाठी इंडिया बुल कडून १० लाख रुपये घेतल्याचे आता कंपनी ही सांगत आहे आणि ते स्वतः ही कबुली देत आहे. या प्रकाराने अविनाश दुधे संतापले . या प्रकरणात आपला वापर झाला आहे असे त्यांना वाटले त्यामुळे त्यांनी मराठेंना खालील मजकुराचे दोन मेल पाठविले
1.Priy Bhave Saheb
Tumi jya Vilas Marathe chya karyakramala yeun tyach koutuk kel to
India Bull aani Sophia Company cha Dalal aahe. Tyane Hindustan sathi
tasech Amba Festival sathi Sophia walyankadun paise ghetale. ha
aani yacha param mitra Pappu patil yanni aadhi India Bull viruddha
mohim ughadali. nantar tyanchyakadunach paise khawun mokale zale.
Delhi, Mumbait ha Dalaliche Dhande karatho. Balasaheb Marathe
Arun Marathechya nawala ha batta aahe. asha charitryhin manasala
takad dewu naka. tumala sawistar patra pathwun yache khare swarup aami
kalawu.
Activist
takad dewu naka. tumala sawistar patra pathwun yache khare swarup aami
kalawu.
Activist
chya paramparela jap .bhadavegiri band kar.
Activist
हे मेल पाठवितांना दुधेंची चूक एवढीच झाली कि त्यांनी दुसऱ्या ई- मेल अड्द्रेस वरून हे मेल पाठविले . मराठे हे दर्डा चे खास असल्याने त्यांनी हा प्रकार केला . मराठेंना आपली चूक कळावी एवढाच हेतू त्यात होता. मात्र या शुल्लक चुकीसाठी अविनाश दुधेंना आता आयुष्यातून उठविण्याची तयारी सुरु आहे. आपल्या मुलाच्या तब्यतीची काळजी घेता यावी यासाठी दुधेंनी पुन्हा अमरावती येथे बदली मिळावी अशी विनंती लोकमत व्यावास्थ्पानाला केली होती. याची माहिती मिळताच मराठेंनी विजय दर्डा यांची भेट घेवून या प्रकारची माहिती त्यांना दिली . सोबतच भरपूर खोटीनाटी माहिती त्यांच्या डोक्यात भरण्यात आली. काही महिन्यापूर्वी विदर्भातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे याचा सत्कार सोहळा अविनाश दुधेंनी पुढाकार घेवून आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात आयुष्यभर समाजासाठी झिजलेल्या वानखडे ना विदर्भातील कार्यकर्त्यांनी ११ लाख रुपयाची थैली दिली होती. मात्र समाजाकडून केवळ घेणाऱ्या दर्डा शेठला अविनाश दुधेंनी लोकमत चा वापर करून या कार्यक्रमासाठी पैशे जमविले असे सांगण्यात आले. हलक्या कानाच्या शेठजींनी त्यावर विश्वास टाकला. त्यानंतर सुरु झाले सूड सत्र . दर्डा शेठनी मेल प्रकरणी एक महिन्यानंतर पोलिसात तक्रार करायला सांगितले. त्यानंतर अविनाश दुधेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर भरपूर दबाब आणण्यात आला. त्यासाठी लोकमत चे समूह संपादक दिनकर रायकर यांना कमी लावण्यात आले. शेवटी दर्डांच्या दबाबामुळे काहीही दम नसलेल्या या प्रकरणात पोलिसांनी सायबर कायद्यांतर्गत दुधेविरूध गुन्हे नोंदविले.
हे प्रकरण इथेच थांबले नाही. अविनाश दुधे यांच्या बद्दल असूया बाळगून असलेले अमरावतीचे ब्राह्मण पत्रकार प्रदीप देशपांडे आणि शिवराय कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या स्थानिक वर्तमानपत्रात दुधे यांच्या विरुद्ध बातम्या छापून आणल्या. हे करताना दुधेंनी मेल काय पाठविले होते हे मात्र सोयीने लपविले. दिलीप एडतकर आणि अनिल अग्रवाल या संपादकांनी खरा प्रकार उघडकीस आणल्याने विलास मराठे आता तोंड लपवित फिरत आहे. या सगळ्या प्रकरणात ब्राह्मण पत्रकार लाबी करून कसे बहुजन समाजातील माणसाची बदनामी करतात हे विदर्भाला पहावयास मिळाले. देशपांडे आणि कुलकर्णी हे खुलेआमपणे इंडिया बुल ला विकले गेलेले पत्रकार आहेत. त्यांनी या प्रकरणात अतिशय खालचा स्तर गाठला . दुधेंना पत्रकारितेतील योगदानाबद्दल काही दिवान्सापुर्वीच चिंतामणराव मारपकवार पुरस्कार जाहीर झाला . या जळकुट्या पत्रकारांनी प्रफुल मारपकवार यांना संपर्क करून दुधे यांना दिलेला पुरस्कार मागे घ्या अशी मागणी केली. या दोघांनी सर्व वर्तमानपत्रांच्या संपादकांनाही बातम्याची कात्रण पाठवली. दुधे अमरावतीत राहले तर आपले दुकान बंद होतात शिवाय आपल्याला कोणी विचारात नाही या पोटदुखीतून दुधे ला आता अमरावतीत उभेच होऊ द्यायचे नाही असे त्यांनी ठरविले आहे. या प्रकरणात विलास मराठे ने मात्र आपल्या 'हिंदुस्तान' मध्ये एकही ओळ छापली नाही याची जोरात चर्चा आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा उबग येवून अविनाश दुधे यांनी मंगळवारी लोकमत ला सोड चिट्ठी दिली . या प्रकरणातून सर्व बहुजन पत्रकार विशेषता जे भूमिका घेवून पत्रकारिता करतात अशांनी सावध होण्याची गरज आहे. शेठजी - भटजी युती दुधे यांच्या प्रमाणे तुम्हालाही आयुष्यातून उठवू शकते. तेव्हा सावधान व्हा . आणि वेळीच आपला मार्ग ठरवा...
ताजा कलम : सगळेच ब्राम्हण तसे नाहीत...त्यामुळे अन्य ब्राम्हणांनी स्वत:ला वाईट वाटून घेवू नये...संत ज्ञानेश्वर ब्राम्हण असताना, ब्राम्हणाकडूनच त्यांना त्रास झाला.दुधे तर बहुजन समाजाचे आहेत...त्यांना काही ब्राम्हणाकडून त्रास झाला, म्हणून जे घडले,ते सडेतोड दिले...
ताजा कलम : सगळेच ब्राम्हण तसे नाहीत...त्यामुळे अन्य ब्राम्हणांनी स्वत:ला वाईट वाटून घेवू नये...संत ज्ञानेश्वर ब्राम्हण असताना, ब्राम्हणाकडूनच त्यांना त्रास झाला.दुधे तर बहुजन समाजाचे आहेत...त्यांना काही ब्राम्हणाकडून त्रास झाला, म्हणून जे घडले,ते सडेतोड दिले...
0 टिप्पण्या