"पुण्य नगरी" लवकरच अकोल्यातून...

विदर्भात सध्या नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या दैनिक  पुण्य नगरीची विदर्भातील  दुसरी आवृत्ती  लवकरच अकोल्यातून प्रकाशित होत असल्याची जोरदार चर्चा वृत्तपत्र सृष्टीत सुरु आहे. नागपुरातील  संपादक सचिन काटे सकाळमध्ये रुजू झाल्यामुळे पुण्य नगरीने लोकमतमध्ये अनेक पदांवर काम केलेल्या जेष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी  यांच्यावर संपादक पदाची धुरा टाकली आहे. दिव्य मराठी, सकाळ आणि मटाच्या आक्रमनापुर्वीच  विदर्भात भक्कम होण्याची खेळी पुण्य नगरीने सुरु केली आहे. पुण्यचे मालक,संपादक  बाबा शिंगोटे आणि त्यांच्या विश्वासू शिलेदारांनी  अकोल्यातून आवृत्ती सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळेच  बाळ कुलकर्णी यांच्यासारखा अनुभवी संपादक  घेतला असून, अकोला कार्यालयाचा विस्तार लवकरच होत आहे.
लोकमतने घात केलेल्या अविनाश दुधे यानाही पुण्य नगरीने घेतले असून, कुलकर्णी आणि दुधे यांनी दोन दिवसांपूर्वीच अकोल्यात भेट देऊन अकोला  आवृत्ती बाबत चर्चा केली, तूर्तास दुधे यांच्याकडे अमरावती विभागाची संपादकीय जबाबदारी राहणार आहे.अकोल्यात  प्रिंटींग युनिट सुरु होणार असून, अकोला ,बुलढाणा, वाशीम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सामाद्कीय मुख्यालय आता अकोल्यात होणार आहे.. सध्या अकोला कार्यालयाची धुरा सांभाळणारे अनिल माहोरे यांच्याकडे व्यवस्थापनाची जबाबदारी राहणार असून, अकोल्यात संपादकीय विभाग प्रमुख म्हणून अकोल्यातीलाच जेष्ठ पत्रकाराची वर्णी लागणार आहे.. या पदासाठी  ज्यांची नवे अग्रक्रमावर आहेत त्यामध्ये सुधाकर खुमकर, अविनाश राऊत यांचा समावेश आहे.. इतरही पत्रकाराची नवे चर्चेत असली तरी, खुमकर, राऊत यांच्या एवढा अनुभव असलेलीले आणि सध्या कुठल्याही पदावर नसलेली ही दोनच नवे घेण्यासारखी आहेत. पुण्य नगरीचा विचार केला तर खुमकर यापूर्वी पुण्य नगरीमध्ये अकोला जिल्हा प्रतिनिधी  होते..  त्यांनी नंतर देशोन्नतीमध्ये  खुर्ची पटकाविली होती.. त्यामुळे पुण्य नगरीचे व्यवस्थापन त्यांच्यावर नाराज झाले होते.  अखेर देशोन्नतीनेही त्यांचा घातच केला.. आता उरले अविनाश राऊत.. त्यांच्यावर संपादकीय प्रमुख पदाची जबाबदारी टाकल्या जाऊ शकते.. मात्र त्याची वर्णी लागू नये यासाठी अकोल्यातीलच  काही पत्रकार देव पाण्यात बुडवून बसले आहेत. राऊत यांची बेधडक पत्रकारिता. दमदार लेखणी अनेकांना नको आहे.. त्यासाठी काही जन अनिल माहोरे यांच्या मार्फत  पुण्य च्या व्यवस्थापनाकडे फिल्डिंग लावत असल्याचीही चर्चा सुरु आहे... दिव्य मराठी अकोल्यात येण्यापुर्वीच अकोल्यातील मोजके चागले पत्रकार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न पुण्य नगरी ने सुरु केला असून मालकाचे विशासू म्हणून ही जबाबदारी अनिल माहोरे यांच्यावर टाकण्यात आली असून, बाळासाहेब कुलकर्णी आणि माहोरे याबाबत लवकरच चर्चा करणार आहेत... पुण्य ने पुढील महिन्यात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सर्वे करण्याचा निर्णय घेतला आहे... . दुसरीकडे बाळासाहेब कुलकर्णी यांनी राऊत, खुमकर याचे काम बघितलेले आहे, कुलकर्णी अकोल्यात लोकमतचे प्रमुख असताना अविनाश राऊत देशोन्नतीमध्ये  आवृत्ती प्रमुख होते, खुम्कारांचीही पत्रकारिता जोरात होती... त्यामुळे कुलकर्णी यांच्याकडून दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब होऊ शकते...

Post a Comment

0 Comments