सुवर्णा दुसाने - जगदाळे यांना वरुणराज भिडे आश्वासक पत्रकारिता पुरस्कार

पुण्यातील पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीने पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारा प्रतिष्ठेचा  ‘आश्वासक पत्रकारिता पुरस्कार’ यंदा  'आयबीएन-लोकमत'च्या मुंबईतील रिपोर्टर सुवर्णा दुसाने - जगदाळे (9930360544 ) यांना जाहीर झाला आहे. त्यांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन!!मुंबईचे नूतन  महापौर सुनील प्रभू यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बायकोच्या नावावर असलेल्या कांदिवलीतील घराचा तपशील दडपला होता. सुवर्णा दुसाने यांनी ही लबाडी पुराव्यांसकट चव्हाट्यावर आणली होती. त्यांना आमिषे, प्रलोभने दाखविली गेली. वरिष्ठ पातळीवरून अगदी शिवसेना कार्यप्रमुखांच्या पातळीवरून दबाव येवूनही त्या मागे हटल्या नाहीत.


खानदेशातील, जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यासारख्या लहानशा गावातून (अर्थात झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचे हे माहेर!) मुंबईत येवून आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटविणारया सुवर्णा दुसाने-जगदाळे यांची कामगिरी त्यामुळेच कौतुकास्पद ठरते..