'नवशक्ती'त तिघांच्या एन्ट्री नंतर तिघांना डच्चू; एग्रोवन, मटा,
आयबीएन लोकमत, मी मराठीमार्गे सचिन परब यांचे शेपूट पकडून श्रीरंग
गायकवाडही आता 'नवशक्ती'त....
- पुण्याच्या पत्रकारितेतून थोडे बाजूला
फेकले गेलेले सुकृत करंदीकर पुन्हा मुख्य प्रवाहात; 'दिव्य मराठी'साठी
पुण्यात प्रमुख वार्ताहर, सोलापूरकर निवासी संपादक संजीव पिंपरकर यांनी
केली मदत
- अलिबागच्या समुद्रकिनारी सोलापुरी संजय आवटे महाराजांचे
बस्तान काही बसेना; खास खबरया रविराज कुचेकर टांग देवून पळाला. आता
मित्राच्या मदतीने मुंबई 'गावकरी'तून आणलेले जबरदस्त आर्टीस्ट टीमही बाहेर
पडण्याच्या मार्गावर. आवटे फक्त स्वत:चाच फायदा पाहता, इतर कर्मचारयांसाठी
काही करीत नाही, ही भावना वाढीस लागली आहे. त्यातच स्वत: आवटेही परेशान
आहेत. त्यांना वर्षभरात कुठलाही ठसा उमटवता आलेला नाही. सुरुवातीला भरपूर
बाता मारल्या; पण रिझल्ट शून्य. कोकणात होता तो 'कृषीवल'चा दरारा घालविला.
मालक जयंत पाटील तर जाम नाराज झाले आहेत. सुप्रियाताईही म्हणताहेत की
'एसेम'च बरे होते. नाशिककर बाई तर रोज संजयरावांची खरपूस हजामत करीत
आहेत..
- 'सामना'मध्ये अलीकडे छोटे सरकार उर्फ आदित्यही लक्ष घालीत
असल्याने खासदार संपादकही हैराण झाले आहेत. त्यांच्या लाडक्या पाच नंबरी
'चिंदर' गावच्या 'बंदर'ने सुरुवातीला पेपरची वाट लावली; आता खासदारांचीही
लावतोय. कुलगुरू हटाव प्रकरण अगदी जोरात असताना 'सामना' गप्प होता म्हणून
छोटे सरकार जाम भडकले होते. आता 'छोटे'ही आपली हजामत करू लागला म्हणून
खासदार संपादकांनी मग 'बंदर'ला धो-धो धुतले. तडकाफडकी विद्यापीठ प्रकारणात
मालिका सुरु केली गेली. स्वत: 'बंदर' फिल्डवर उतरला. आता बोंबला! हा काय
डोंबलाची बातमी लिहिणार. दहावी नापास प्रसादाची जेव्हढी कुवत तेव्हढीचा
रत्नागिरीतील 'बंदर'चीही!तरीही हा बंदर दोन-दोन पोरींना घेवून मजा मारतोय..
मर्जी सांभाळेल त्याला मंत्रालय.. नवीनच जॉईन झालेला एक खानदेशी थेट
बदल्यांची कामे घेवून महसूलमंत्र्यांकडे जातोय..
- 'सकाळ'मध्ये
अर्धवट बीट; जोडीला स्पर्धेत 'प्रहार'मधून आलेल्या त्याच संस्थानातील बाई
यामुळे हैराण झालेले एक बाळ नुकतेच 'तरुण भारत'मधील जुने साहेब जिथे रुजू
झालेत तिथे, परळात जावून आलेत.
- मुंबईत सध्या पत्रकारितेत फेल
असलेले टगे रात्री विविध वाहिन्यांवरून जानवी ओंजाळीत आपल्या तोकड्या
बुद्धिमत्तेचे तारे पाजळीत असतात.