वाशीम - लोकमतचे उपसंपादक तथा कारंजा मोडेम प्रमुख विकास देशमुख यांनी २५ मार्च रोजी लोकमतचा राजीनामा दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नागपूर सकाळ मध्ये ते रुजू होतील. काही महिन्या अगोदर तत्कालीन संपादकीय प्रमुख अविनाश दुधे यांनी देशमुख यांच्यावर कारंजा मोडेम प्रमुख म्हणून जबाबदारी टाकली होती. ती त्यांनी उत्तमरीत्या पेलली. यापूर्वी देशमुख वाशीम ग्रामीणचे काम पाहत होते. त्यांना महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अभियानाचा सन २००९-१० मध्ये पत्रकारितेत दिला जाणारा अमरावती विभागाचा पहिला पूरस्कार प्राप्त आहे. पत्रकारितेत भावी जीवनासाठी त्यांना शुभेच्छा....
0 टिप्पण्या