सकाळ-एग्रोवनचे
सिनीअर सबएडीटर दीपक चव्हाण यांनी एग्रोवनला रामराम केला आहे. मुळचे
कास्तकार असलेले चव्हाण एग्रोवन सुरू झाला तेव्हापासून तेथे होते. अतिशय
अभ्यासू, कष्टाळू व प्रामाणिक अशी त्यांची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील कसमा
पट्ट्यातले मूळ असलेले चव्हाण यांनी एग्रोवनमधील पुरवण्या व विशेष
विषयांचे काम चांगल्या पद्धतीने केले. कमअस्सल लोकांना अधिक वेतन, बाहेर
दौ-याच्या संधी मिळत गेल्याने तसेच कामाचे समाधान नसल्याने ते काहीसे नाराज
होते. गेल्या तीन चार महिन्यांत शैलेंद्र चव्हाण (जळगाव), सुदर्शन सुतार
(सोलापूर), आश्वीन सवालाखे (नागपूर) या जुन्या लोकांनी एग्रोवन सोडले आहे.
ज्यांना बाहेर संधी मिळू शकत नाही असे लोक केवळ रडतखडत काम करीत आहेत.