सकाळमध्ये तीन तट- मटामध्ये दुभंग आणि पद्मश्रींचा राग

पुण्यातील सकाळ, मटा आणि पुढारीत गेल्या आठवड्यात् महत्वपूर्ण घडामोडी घडल्या असून पत्रकार वर्तुळात त्यामुळे खळबळ उडाली आहे. सकाळमध्ये सर्व काळ `घोळ' करणारे गोविंदराव, टीम माळी आणि `डोईफोडी' करून निष्ठावंत गटाचे नेते म्हणवणारे रमेश आणि त्यांच्या कंपूमुळे सकाळमध्ये तीन उभे तट पडले आहेत. 
गोविंदराव यांनी सोबत नेलेल्या छ्त्रपती संभाजी, सहकार`रत्न' सावळे, आणि पिंपरीच्या लटपट्या ओम आणि त्याच्या `खास' साळवींचा आणि एकंदरच टीम गोविंदचा काहीही विशेष प्रभाव पडलेला नाही. पहिला महिना सोडल्यानंतर गोविंदरावांनी किल्ला लढवला खरा; पण मर्यादा पुरुषोत्तम संभाजींचे लक्ष एकीला हात करायचा दुसरीला डोळा मारायचा आणि भल तीबरोबरच घरोबा करायचा यातच गुरफटल्यामुळे आणि पुण्याची प्राथमिक माहिती नसलेल्या लातूरकर सावळेंच्या निषर्भतेमुळे या टीमची प्रतिमा डागळली. अकार्यक्षमतेबरोबरच बाकीचेही त्यांचे उद्योग उघड झाले. त्यामुळे माळी गटाने उचल खाल्ली. त्यांच्या डीआर सोडून कडूसकर वगैरे मंडळींचीही मर्यादा सकाळमध्ये उघड झाली. पण या गटाने टीम गोविंदला पिंपरीपुरतेच मर्यादीत ठेवून बाजी मारली आहे. गोविंदरावांनी पुण्यातील राजकारणावर अवाक्षरही लिहायचे नाही ही माळी गटाची मागणी मान्य झाली. पुण्यातील राजकारणातील उलटसुलट बातम्यांनी माळी आणि त्यांची टीम त्रस्त झाली होती. या माळींच्याच हाताखाली गोविंदाने पत्रकारीतेचे धडे गिरवले. पण त्या माळींनाच घरचा रस्ता दाखविण्याची भाषा आता ते आपल्या टीममध्ये बोलून दाखवित आहेत. डोईफोडे ग्रुप आपण सकाळचे खरे निष्ठावंत असल्याचा दावा करतो आहे. या गटात योगेश कुटे हे त्यांचे खंदे शिलेदार आहेत. शेवलेकरांकडून मार खाल्ल्यामुळे फेमस झालेल्या कुटेंचे अनेक् उद्योग त्यानंतर उघड झाले. या तिन्ही गटांमध्ये सध्या जोरदार शीतयुद्ध सुरू आहे. त्यातूनच परस्परांविरुद्ध अफवा पसरविण्याचे तंत्र या तिन्ही गटांनी अवलंबले आहे. माळी गटाला पालिकेतून चाचा चौधरीमार्फत किती पाकीटे मिळतात याची माहिती घोळवे गटाने मिळवली. तर घोळवेंनी केलेले घोळ शोधण्यासाठी माळींनी आपली पिंपरीतील जुनी टिम कामाला लावली. डोईफोडे-कुटे मिळेल त्या पाकीटावर समाधान मानून उर्वरीत दोन्ही गटांविरुद्धची माहिती संकलीत करीत आहे.
            स्मार्ट मित्र असलेल्या मटामध्येही उभे दोन तट पडले आहेत. करंदीकरांविरुद्ध पेंडसे -लोणींच्या खांद्यावर बंदुक ठेवून निशाणा साधत आहेत. करंदीकरांना कोल्हापूरला पाठवून पुण्याच्या संस्थानाचा ताबा घेण्याच्या इर्षेने पेंडसे पेटून उठले आहेत. त्यामुळेच त्यांनी करंदीकरांच्या विश्वासू सहका-यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे सत्र अवलंबिले आहे. त्याचवेळी पेंडसे यांच्या`कास्टींग काऊच' चे प्रकरण थेट मुंबईला करंदीकर यांनी पोचविले आहे. सध्या या उभय गटात जुंपलेल्या भांडणाचा थेट परिणाम अंकावर होऊन एकच बातमी एकाच अंकात दोन वेळा छापून येण्यासारखे प्रकर वारंवार घडू लागले आहेत.
         पुढारीकारांनी गेल्या आठवड्यात तातडीची बैठक घेऊन संपादकीय विभागाची आणि जाहिरात विभागाची झाडाझडती घेतली. महसूल कमी होऊ लागल्याने पद्मश्री  कमालीचे संतापले. त्यांनी सुनील नरसिंहन आणि त्यांच्या टिमची कडक शब्दांत हजेरी घेतली. तसेच नंदू, संजू आणि मॅडम यांना खड्या शब्दांत सुनावले. तेथे अर्जुन शिरसाट यांना कामावर घेण्याचा आदेश कोल्हापूरहून देऊनही नंदुने पुण्यात त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. या प्रकाराबाबत काही आकस्मिक कृती कोल्हापूरहून घेतली जाण्याची शक्यता असून पुढारीला संपविण्याचा जणू विडा घेतलेल्या नंदू, संजू आणि मॅडमबाबत काही महत्वपूर्ण निर्णय होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.