मध्य
भारत आणि विदर्भ प्रांतात गेली ६५ वर्षे प्रसिद्ध असलेले हिंदी दैनिक
युगधर्म यांनी हळुवारपणे पावले टाकत आपला विस्तार करण्याचे ठरवले आहे.
सध्या पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारित करण्याची प्रबंध संपादक आणि मालक
अरुण जोशी यांची योजना आहे. त्यासाठी विदर्भात कुठल्याही प्रेसमध्ये नसतील
अशी अद्यावत मशिनरी त्यांनी आपल्या हनुमान नगर, महाल या नागपूर येथील
प्रिंटींग प्रेस मध्ये ठेवली आहे. त्याचबरोबर संपूर्ण फोर कलर पेपर सुरु
करणारे यंत्र देखील बसवले जात आहे. एकूण सहा वृतपत्रे श्री. अरुण जोशी
नागपूरहून चालवतात. मुंबईतून येणाऱ्या बातम्यादेखील युगधर्म मध्ये
प्रामुख्याने दिसून येत आहेत. त्यासाठी मुंबईचा संपादकीय विभाग अशोक शिंदे
यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.