जळगाव- रविवारी झालेले कोळी समाजाचे आंदोलन आटोपण्याच्या परिस्थितीत असताना
अचानक जमावाने फोटोग्राफर व पोलिसांवर जोरदार दगड फेक सुरु केली.
या दगडफेकीत कव्हरेजसाठी आलेले
दैनिक भास्कर चे प्रवीण गायकवा ड, दिव्य मराठीचे आबा मकासरे हे दोन्ही फोटोग्राफर
जखमी झाले, तर आबा मकासरे यांना पाच ते सात युवकांनी घेराव करून त्यांचा
कैमेरा पळवून नेण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे एक पोलीस अधिकारी धावत
आल्याने आबा मकासरे यांची सुटका झाली. नंतर दोघांवर दुपारी जिल्हा
रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आला. घडलेला प्रकारची माहिती आंदोलका च्या पदाधिकार्यांना देण्यात आली. त्यांनी झालेल्या घटनेची निंदा व्यक्त केली. मात्र यावेळी एक घाणेरडा प्रकार उघडकीस आला मिडिया आणि आंदोलक यांच्यातील एका
मध्यस्ती [फोटो पत्रकार ] याने झालेल्या घटनेचे भांडवल करीत.
१५ हजार लाटल्याचे समजले. आज दिवसभर फोटो पत्रकारांची झालेल्या
प्रकाराबद्दल चर्चा रंगत होती.