सांगली- सांगलीच्या वेश्या वस्तीत वेश्या महिलांची देशातील पहिली शाळा सुरु
करणारे पत्रकार दीपक चव्हान यांना राष्ट्रीय तपोभूमी गोवा गौरव आदर्श
पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.१४ जून रोजी गोवा राज्याचे मुख्यमंत्री
मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते गोव्यात या पुरस्काराचे सन्मानपूर्वक वितरण
होणार आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील फडतरे यांनी सांगलीत या
पुरस्काराची घोषणा केली
पत्रकार दीपक चव्हान हे गेल्या १२ वर्षापासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत आहेत. आपली पत्रकारिता सांभाळून त्यांनी समाजसेवेचे वृत्त हाती घेतले. आपल्या समाजसेवेच्या आवडीतून पत्रकार दीपक चव्हान यांनी व्यसनमुक्ती,युवक संघटन,महिला सबलीकरण, बालकामगार विरोधी चळवळ यासह अनेक राष्ट्रीय प्रबोधनात्मक कार्यक्रम घेवून समाजात सातत्याने क्रांती करण्याचा प्रयत्न केला. समाजातील दुर्लक्षित आणि तुच्च मानल्या जाणार्या वेश्या महिलांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दीले आहे. या महिलांसाठी त्यांनी देशातील पहिली शाळा सांगलीत सुरु केली. सन २००६ पासून पत्रकार दीपक चव्हान हे स्वता ही शाळा चालवतात. तसेच वेश्या महिलांच्या मुलांसाठी राज्यातील पहिली अंगणवाडीची सुरु केली आहे.तरुण मुलीना लेझीम बरोबर स्वचतेचेही धडे देनेचे कामं पत्रकार दीपक चव्हान करीत आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेत कराड येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने यंदाच्या वर्षीचा राष्ट्रीय तपोभूमी गोवा गौरव आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील फडतरे यांनी सांगलीत या पुरस्काराची घोषणा केली आहे. १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता गोवा येथील कुंडईच्या तपोभूमी आश्रमात गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते आणि स्वामी ब्रम्हेशानंद महाराज यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे सन्मानपूर्वक वितरण होणार आहे. या कार्यक्रमास गोव्याचे उद्योजक विजय चौगुले,पेन सुधागड्चे आमदार धैर्यशील पाटील, महिला उद्योजक फरीदा खान,सुरेश दळवी आदींसह गोव्याचे स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत. या पुरस्काराबद्दल पत्रकार दीपक चव्हान यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.