पत्रकार पार्टे मारहाण प्रकरणी पाच जणांना अटक

माणगाव - लोकमतचे इंदापूर वार्ताहर धनंजय पार्टे यांना माणगावमध्ये शेकापच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे, तर तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
धनंजय पार्टे हे एका कार्यालयात बसले असताना स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा राग मनात धरून शेकापच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खेचून कार्यालयाबाहेर काढले. मुंबई-गोवा रस्त्यावरून कचेरी रोडपर्यंत फरफटत आणून त्यांना जबर मारहाण केली. वाहतूक पोलीस भोईर यांनी संतप्त कार्यकर्त्यांना रोखून पार्टे यांना पोलीस ठाण्यात नेले.
धनंजय पार्टे यांनी आपला विनयभंग केल्याची व खंडणी मागितल्याची तक्रार शेकाप कार्यकर्त्या वर्षा कोलिष्टे यांनी केली आहे. याप्रकरणी
पोर्टेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगांव कोर्टाने ५ जणांना ३0 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. म्हसळा - माणगाव तालुक्यातील शासकीय शैक्षणिक निधीच्या अपहाराला वाचा फोडणार्‍या पार्टे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ म्हसळय़ातील पत्रकारांच्यावतीने तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments