'बेरक्या'चा आवाज बंद करण्याचा कुटील डाव

बेरक्या ब्लॉग विषयी काही पिसाळलेले पत्रकार दररोज विविध अफवा पसरावित आहेत.ज्यांच्या ढुंगणाला मिरच्या लागल्या, तेच अशा अफवा पसरावित आहेत.या अफवांकडे चाणाक्ष पत्रकारांनी लक्ष देवू नये, अशी विनंती आहे.
वृत्तपत्र मालक , पत्रकार व कर्मचा-यांचे जे शोषण करीत होते, त्यातून बेरक्या ब्लॉगची निर्मिती झाली आहे.भविष्यात ज्या - ज्या वेळी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकरांचे नाव निघेल, त्या - त्या वेळी बेरक्याचाही उल्लेख केला जाईल, असे ज्येष्ठ पत्रकार व समाजवादी विचारवंत जयदेव डोळे नेहमीच म्हणतात. जयदेव डोळे हे अनेक पत्रकारांचे गुरू असून, ते सहसा कोणाची स्तुती करीत नाहीत.त्यांनी  काढलेले गौरवोद्गार आमच्यासाठी ISO प्रमाणापत्र आहे.
बेरक्या ब्लॉग बंद करण्यासाठी काही मालक टपले आहेत. पत्रकारांचा आवाज घोटण्याचा हा कुटील डाव आहे.हा डाव उधळून लावण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.आपण सहकार्य नाही केले तर पत्रकारांचा पाठीराखा - बेरक्या पोरका होईल.त्यासाठी कोणालाही भीक न घालता एकत्र येवू या.चांगले पत्रकार एकत्र आले तर बेरक्या जिवंत राहील व  लोकशाहीचा चौथा खांब पुन्हा एकदा मजबूत होईल.

आपलाच
बेरक्या उर्फ नारदजाता - जाता : आम्ही स्वत:ला कधीच ग्रेट मानत नाही व जांभेकरांची कधीच तुलना करीत नाही.बेरक्या हा पत्रकारांचा कॉमनमॅन आहे. दबलेल्या व पिचलेल्या पत्रकारांना न्याय देण्याचे काम बेरक्याने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून केले आहे.या ब्लॉगचा वापर आम्ही स्वत:च्या स्वार्थासाठी कधीच केला नाही व करणार नाही.
मालक लोकांच्या आम्ही विरोधात नाही, मात्र त्यांच्या चुकीच्या धोरणाविरोधात आहोत.ज्या पत्रकार व कर्मचाऱ्यांमुळे वृत्तपत्र चालते, त्यांच्यावर मालकांनी अन्याय करू नये,अशी आमची भूमिका आहे.अनेक पत्रकारांना अचानक काढून टाकले जाते, गरज सरो वैद्य मरो, अशी मालकांची प्रवृत्ती असले तर त्यावर प्रहार नको का?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या