पुण्यातील पत्रकारांची खाबुगिरी कोणत्या थराला गेली आहे आणि खालपासून् वरपर्यंत सगळीकडे कशी खाबुगिरी चालली आहे याचे किस्से अनेकदा ऐकायला मिंळतात. पत्रकारीतेला कलंक असलेल्या या खाबू गटाची अंदाधुंदी गेल्या काही वर्षात भयानक वाढली आहे. त्यामुळे बिल्डर्स, शैक्षणिक संस्थांचे चालक आणि शासकीय अधिकारी त्रस्त झाले आहेत. त्याला लगाम घालण्याची आवश्यकता होती. `सरहद' या संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी अखेर मांजराच्या गळ्यात घंटा बांधलीच.
नहार यांनी काश्मीर प्रश्नी केलेल्या महान कार्यानंतर तेथील निर्वासित मुलांसाठी शाळा व महाविद्यालय सुरू केले. पंधरवड्यापूर्वी नहार यांना लोकमत कार्यालयातून सातत्याने `बाविस्करांना भेटा' असे निरोप मिळत होते. ते ज्यापद्धतीने दिले जात होते की चाणाक्ष नहारही स्तंभित झाले. त्यांनी काही दिवस या निरोपांकडे दुर्लक्ष केले. अखेर त्यांना `तुमच्याविरुद्ध एक बातमी आहे. ती आम्ही थांबवली आहे. बाविस्करांना भेटा' असा निरोप मिळाला. त्यावर ते लोकमतच्या कार्यालयात गेले. तेथे नेहमीप्रमाणे बाविस्कर नव्हतेच. त्यामुळे तेथील जोशींशी नहार यांनी संपर्क साधला. त्यावर बातमी असल्याचा निरोप खरा असल्याचे जोशी यांनी त्यांना सांगितले. पण बातमी कसली हे सांगितले नाही. त्यानंतर दुस-याच दिवशी अर्धा पानभर `सरहद' शैक्षणिक संस्थेची बातमी 16 जूनच्या अंकात झळकली. ती पूर्णत: निराधार असल्याचा नहार यांचा दावा आहे. त्यासाठी त्यांनी लगेच खुलासा करणारी पत्रकार परिषदही घेतली. पण, त्याच दिवशी सकाळी झालेल्या संपादकीय बैठकीत (योगायोगाने) हजर असलेल्या बाविस्करांनी त्यांचा खुलासा देण्याची गरज नाही असे ठणकावून सांगितले. अखेर पुरवणीत चार ओळींचा खुलासा छापण्यास ते राजी झाले. पण या मागे असलेला बाविस्करांचा डाव आणि त्यांची वृती उघड करण्याचा विडा नहार यांनी उचलला. त्यासाठी त्यांनी त्यांच्या देशभरात विविध क्षेत्रात उच्चपदस्थ असलेल्या शेकडोजणांना मोबाईलवरून मेसेज पाठवून बाविस्करांचा बुरखा फाडला. तसेच त्यांच्याविरुद्ध हायकोर्टात दावाही दाखल केला. दरम्यान विदेशात असलेल्या विजयबाबू दर्डांना हे वृत्त समजले. त्यांनी नहार यांची समजूत काढली. भारतात परतल्यावर बोलून ठरवू असे त्यांना आश्वासन दिले. पण नहार यांच्या सर्वच मित्रांनी त्यांना वृत्तपत्रांच्य पडद्याआड चाललेल्या शोषणाविरुद्ध लढण्यास पाठींबा दिला आहे. त्यामुळे लोकमतकार चांगलेच गोत्यात आले आहेत.
पुणे महापालिकेतील चाचा चौधरी, झेडपीतील भोईटे-जाधव टोळी आणि आपण पत्रकार आहोत असा दावा करून करंदीकर-पेंडसेंच्या तुंबड्या भरणारा घा-या परांजपे आणि त्याचे बगलबच्चे असे कितीतरी दुकानदार सध्या पुण्यात धुदगुस घालत आहेत. निरनिराळ्या नेत्यांच्या पत्रकार परिषदांना उपस्थिती लावून आणि वेडवाकडे प्रश्न विचारून ख-या पत्रकारांना मान खाली घालायला लावणारा घा-या परांजपे कुठल्याही पेपरचा पत्रकार नाही. मग तो पत्रकार संघात लुडबुद करतोच कसा? राष्ट्रवादीच्या `अंकुश' बरोबर रात्री जागवून निरनिराळ्या पक्षाच्या नेत्यांशी करंदीकर-पेंडसे जोडगोळीचे सेटींग करून ते आणि परांजपे किती गब्बर झालेत हे सर्वांना माहिती आहे. झेडपीमध्ये `उद्योग' वाढल्याने प्रभातकारांनी श्यामतात्यांना खड्यासारखे दूर केले. स्मार्ट मित्रामध्ये मात्र त्या बीटच्या जाधवरावांकडून मिळणा-या गलेलठ्ठ पाकीटांमुळे सर्वकाही आलबेल आहे. गेली आठवडाभर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिका-याविरुद्ध मालिका चालवून त्याच्यावर कारवाई व्हायच्यावेळी मात्र त्याचे नाव का गाळले गेले? याचा तपशील मुंबईत पानवलकरांपर्यंत पोहोचला आहे. एवढे दिवस खालच्या पातळीवर चाललेली ही खाबुगिरी लोकमतला बाविस्कर आल्यावर एकदम वरच्या पातळीवर गेली. कोथरुडमधील एका `भाऊं'च्या पुढेपुढे करून त्यांनी घर कसे मिळवले? ते दिवस-दिवस कसे गायब असतात? कोणाचाही फोन उचलता न् येण्याएवढे ते कोणत्या `काम'गिरीत मग्न असतात हे आता सा-या पत्रकारांना माहिती झाले आहे. या सर्वांचा बुरखा कोणीतरी टरकवण्याची आवश्यकता होती. नहार यांनी सुरुवात केली आहे. त्यात अनेकजण उघडपणे सहभागी होतील आणि येत्या काही दिवसांत हे खाबुगिरी करणारे पत्रकार समाजासमोर नंगे होतील. त्यासाठी पुण्यातील एका जबाबदार समाजघटकाने मोहिम सुरू केली आहे आणि त्यात काही ख-या पत्रकारांचाही समावेश आहे.
दैनिक लोकमत, पुणे दि.16 जून

0 टिप्पण्या