आणखी एका पत्रकारावर हल्ला

महाराष्ट्रातील आणखी एक पत्रकार राजकीय पुढाऱ्यांच्या हल्ल्याचा शिकार ठरला.घटना आहे रायगड जिल्हतील माणगावची.माणगाव येथील पत्रकार धनंजय पार्टे यांच्यावर शेकापच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले.त्याचे डोके फोडण्यात आले आहे.हल्ला एवढा भीषण होता की,गेभीर जखमी झालेल्या पार्टे   उपचारासाठी मुंबईला हलवावे लागले आहे.
    माणगाव तालुक्यातील बामणोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे काम सुरू आहे.हे काम शेकापच्या ठेकेदाराला दिल्याची माहिती आहे.बांधकाम अध्याप 25 टक्के देखील पूर्ण झाले नसले तरी शेकापच्या ताब्यातील जिल्हा परिषदेने ठेकेदाराचे बिल अदा केले आहे.ही माहिती पार्टे यांनी माहितीच्या अधिकाराखाली उघड केली आहे.नंतर त्यासंबंधिची बातमी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झाली केली.बातमीमुळे शेकापच्या पुढाऱ्यांचे बिंग फुटल्याने संतप्प झालेल्या पुढाऱ्यांनी सोमवारी पार्टे यांच्या कार्यालयात घुसून त्यांना बेदम मारहाण केली.पाच-पन्नासजणांचे शेकापचे टोळके पार्टे यांच्या कार्यालयात घुसले.पार्टे यांना मारहाण केली.यामध्ये जिल्हा परिषदेचे सभापती ज्ञानदेव पवार यांच्या पत्नी अंजली पवार यांचाही समावेश होता असे सांगण्यात आले.पार्टे यांना मारहाण करण्यात आली आणि वरती त्यांच्यावरच आता विनयभंगाची तक्रार अंजली पवार यांनी दिली आहे .पत्रकारांवर हल्ले करायचे आणि त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवायचे ही शक्कल राज्यभर अवलंबिली जात आहे.माणगावमध्येही तेच केले गेले आहे.या घटनेच्या विरोधात रागयडमधील पत्रकार एकजूट झाले असून त्यांनी आता 29जूनला मोर्चा काढण्याचा निर्णयघेतला आहे.रायगड प्रेस क्लब,मराठी पत्रकार परिषद आणि महाराष्ट्र पत्रकार हल्ला  विरोधा कृती समितीने या घटनेचा तिव्र धिक्कार केला आहे.1ऑगस्ट 2009 नंतरची राज्यातील पत्रकारावरील हल्लयीची ही 221 वी घटना आहे.पत्रकारांना राज्यात काम करणे कठीण झाले असताना सरकार अजूनही पत्रकार हल्ला विरोधी कायदा करण्यास  टाळाटाळ करीत आहे.या अधिवेशनात एक खाजगी बिल येणार आहे.त्यातून काय निष्पण्ण होते ते बघायचे.


एस.एम.देशमुख यांच्या ब्लॉगवरून साभार  

Post a Comment

0 Comments