महाराष्ट्राच्या जनमनात वसलेल्या लोकमत समूहाचे हिंदी दैनिक ‘लोकमत समाचार’च्या पुणे आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज (सोमवारी) सकाळी झाले. स्वारगेटस्थित गणेश कला क्रीडा मंचाच्या सभागृहात सकाळी साडेअकराच्या सुमारास पार पडलेल्या या समारंभात लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खा. विजय दर्डा, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच राज्यसभा सदस्य व वरिष्ठ स्तंभलेखक बलबीर पुंज, प्रख्यात शायर मुनव्वर राणा, द न्यू इंडियन एक्स्प्रेसचे संपादकीय सल्लागार प्रभू चावला, तहलकाचे संपादक तरुण तेजपाल हेही या समारंभास उपस्थित होते. यावेळी लोकमत समूहाचे कर्मचारी, तसेच लोकमतचे नियमित वाचक असणारे पुणेकरही मोठ्या संख्येने हजर होते.
स्वतंत्र विचारांच्या वृत्तपत्रांची देशाच्या प्रगतीसाठी गरज आहे. 'लोकमत'ने नेहमीच निर्भीड वृत्तपत्रकारिता केली आहे. 'लोकमत समाचार'च्या माध्यमातून या कामास आणखी बळ मिळेल, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
पुणेकरांनी जसा मराठी आवृत्तीला भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद हिंदी आवृत्तीलाही मिळेल अशी आशा लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी व्यक्त केली. हिंदी भाषिक वृत्तपत्रे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरत नाहीत, तरीही देशाला जोडण्याचे काम हिंदी वृत्तपत्रे करत असतात. युवा वर्गाची राजधानी असलेल्या पुण्यात हिंदी वृत्तपत्र सुरू करण्याचे स्वप्न मी पाहिले होते, ते आज पूर्ण झाले असे खा. विजय दर्डा यावेळी म्हणाले.
नागपूर, औरंगाबाद, अकोला, कोल्हापूर आणि जळगाव पाठोपाठ आता पुण्यातून प्रारंभ होत असलेल्या या राष्ट्रीय हिंदी दैनिकाची ही सहावी आवृत्ती आहे. झपाट्याने कॉस्मोपॉलिटीन रुपांतरीत होत असलेल्या महाराष्ट्रातील हिंदी भाषकांसाठी १४ जानेवारी १९८९ नागपूर येथून ‘लोकमत समाचार’ सुरू करण्यात आले.

0 टिप्पण्या