जय महाराष्ट्रच्या संपादकीय विभागात महत्त्वाच्या पदांसाठी अनेकांची लाँबिंग

जय महाराष्ट्र या चँनेलच्या संपादकीय विभागात अनेक महत्त्वाच्या पदांसाठी लाँबिंग सुरू झाले आहे. यामध्ये नवशक्तिचे माजी संपादक सचिन परब, झी चोवीस तासचे माजी संपादक मंदार परब यांची नावे आघाडीवर आहेत. अशातच राणे यांच्या प्रहारमध्ये दोन वर्षे राजकीय बीट सांभाळणा-या आणि सध्या दै. कृषीवलमध्ये राजकीय बातमीदार असलेल्या आनंद गायकवाड यांनाही जय महाराष्ट्रच्या संपादकीय विभागात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
 दोन्ही परब मंडळींचा मुंबई सोडून इतरत्र चँनेलसाठी पत्रकारितेचा अनुभव तसा कमीच आहे. त्यातुलनेत महाराष्ट्राच्या कानाकोप-यात चँनेलसाठी पत्रकारिता केल्याचा अनुभव गायकवाडकडे अधिक आहे. मात्र, साम टिव्ही वगळता गायकवाड यांच्याकडे चँनेलच्या संपादकीय विभागात मोठ्यापदावर काम केल्याचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता कमीच आहे. परब मंडळींनी जोरदार लाँबिंग केले आहे. तर दुसरीकडे गायकवाड यांच्याकडे संपादकीय विभागातील महत्त्वाची जबाबदारी टाकावी, यासाठी काहींनी राणेंकडे शब्द टाकला आहे.

Post a Comment

0 Comments