जालना - भोपाळ शेठच्या पेपरमधील एक रिपोर्टर रात्रीच्या वेळी ब्ल्यू पाहताना आढळून आला होता.त्याची तक्रार ब्युरो चिफने व्यवस्थापकांकडे केली होती.मात्र रिपोर्टरला प्रमोशन तर ब्युरो चिफला नारळ देण्यात आल्याने पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा आणि वेश्येच्या गळ्यात मणिहार या म्हणीचा प्रत्यय येत आहे.
भोपाळ शेठचे येथील कार्यालय कामाऐवजी फालतू उचापतीचे केद्र बनले आहे. जालन्यात अंक सुरू झाल्यानंतर पिंपळगाव रेणुकाईच्या एका एजंटाने वितरण व्यवस्थापकाच्या विरोधात चार पानी तक्रार नोंदविली होती.त्याची शाई वाळते तोच, कार्यालयातील एक रिपोर्टर रात्रीच्या वेळी चक्क बातम्याऐवजी ब्ल्यू फिल्म पाहत असल्याचे उघडकीस आले होते. विशेष म्हणजे हा रिपोर्टर सेक्स विषयक माहितीचे प्रिंटही काढत असत.एकदा ही प्रिंट प्रिंटरमध्ये अडकली, ती अर्धवट प्रिंट ब्युरो चिफच्या हातात लागताच, त्याने रिपोर्टरचा हा प्रताप व्यवस्थापकांकडे कळविला.व्यवस्थापकांनी या रिपोर्टरकडून माफीनामा लिहून, प्रकरण आपसात मिटविले.कारण या रिपोर्टरचे हात लांब होते.
कालांतराने या प्रतापी रिपोर्टरने ब्युरो चिफचाच काटा काढला.त्याने ब्युरो चिफच्या काही गोष्टी गोळा करून, व्यवस्थापकांना कळविल्या.व्यवस्थापकांनी मग ब्युरो चिफला नारळ दिला, तर ब्ल्यू फिल्म पाहणा-या रिपोर्टरला पगारवाढ करून, प्रमोशन दिले.यालाच म्हणतात, भोपाळ शेठच्या पेपरमध्ये वशिला लांब असेल की,कितीही दिवे लावले तरी, काहीच वाकडे होत नाही.
ता.क.- माफीनामा लिहून देणा-या या प्रतापी रिपोर्टरचे नाव आम्ही मुद्दाम डिलीट केले आहे.

0 टिप्पण्या