जळगाव - सकाळ चा स्टार रिपोर्टर म्हणजे कोतकर, मिटिंग मध्ये साहेबांना शहरातील छोट्या मोठ्या घटना बढून-चढून सांगण्यात मास्टर. तर साधारण दीड ते दोन वर्षापूर्वी सकाळ ला लागलेला अतिउत्साही रईस शेख. शेख सकाळ ला लागल्या लागल्या माने यांनी कोतकर कडील क्राइम बीट काढून शेख यांच्या कडे सोपविला. शेख ला आव्हानात्मक बीट मिळाल्याने आनंद झाला तर कोतकरचा हिरमोड झाला. त्या दिवसापासून गेलेले बीट मिळवण्यासाठी कोतकर ने सर्वोतोपरी प्रयत्न केले , माने यांचे कान हि कोरले मात्र काहीही उपयोग झाला नाही. बऱ्याच वेळेस माझे मानसिक संतुलन ठीक
नाही अशी बतावणी करून सुटीवर निघून जायचा तर कधी मी लोकमतला जाणार असे पिल् लू सोडायचा. शेवटी माने यांची बदली चे निस्च्छित झाल्यावर त्यांनी बीट ची खांदेपालट करण्याचे ठरविल्यावर रईस शेख ला महापालिका बीट दिला गेला आणि कोतकर ला क्रीम माफ करा 'क्राइम'.
0 टिप्पण्या