तरुण भारतच्या विदर्भ आवृतीची घोडचूक

नागपूर - समाजसेविका साधनाताई आमटे यांच्या प्रथम स्मृतिदिनी सोमवार, ९ जुलै रोजी आनंदवनात वृक्षारोपण करून कार्यक्रम पार पडला. त्याचे वृत्त तरुण भारत च्या विदर्भ आवृतीने मुख्य अंकाचं पान २ वर सचित्र प्रकाशित केले. मात्र यात एक मोठी घोडचूक वरोरा येथील स्थानिक वार्ताहराने दिलेल्या बातमीत झाली आहे.
 या बातमीत त्यांनी बाबा आमटे यांचा तिसरा स्मृतिदिनी सोमवार, ९ जुलै रोजी पार पडल्याचा उल्लेख आहे. शिवाय बाबा आमटे यांचे ९ जुलै २००९  व साधनाताई आमटे यांचे ९ जुलै २०११ ला निधन झाले होते. त्यामुळे दोघांचाही स्मृतिदिन एकाच दिवशी होता. असा जावई शोध केला आहे. वास्तविक पाहता बाबा आमटे यांचे निधन ९ फेब्रुवारी २००८ रोजी झाले, हे सर्व जगाला ठाऊक आहे. मात्र हि बाब स्थानिक वार्ताहर, जिल्ह्य प्रतिनिधी, उपसंपादक यांना ठाऊक नाही हि शरमेची बाब आहे.  हि बातमी वाचून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Post a Comment

0 Comments