नगर - सर्वसाधरण सभेत अशोभनीय गोंधळ घालण्यासाठी राज्यभर बदनाम असलेव्या नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालकांच्या सभेत यावेळी पत्रकारांवर आरोप झाले. हिशोबाची विचारणा सुरू असताना सत्ताधारी संचालकांनी पत्रकारांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून त्यासाठी पाच लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले.
यासंबंधीचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाले. त्यावर नगरच्या पत्रकारांमध्ये मोठी खळबळ उडाली. प्रेस क्लबतर्फे याचा निषेध करण्यात येऊन बँकेला एक खरमरीत नोटीस वजा पत्र देण्यात आले. त्यावर बँकेने एकदम नमते घेत अशी काही चर्चाच झाली नसल्याचे प्रेस क्लबला आणि लोकमतलाही लेखी कळविले आहे. दरम्यान, प्रेस क्लबने यासंबंधी लोकमतकडूनही स्पष्टीकरण मागविले आहे. पत्रकारांची अशी बदनामी खपवून घेणार नसल्याचे प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी ठणकावून सांगितले आहे.
सोबत प्रेस क्लबने बँकेला दिलेले पत्र.
(मन्सूर शेख यांचा नंबर 9422236333, किंवा 02412347866).
0 टिप्पण्या