'लोकमत' नगर आवृत्तीच्या वर्धापनदिनाचा फज्जा

अहमदनगर- रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून मोठा गाजावाजा करतानाच एक कोटी रुपयांच्या बिझनेसचा चॉकलेट दर्डाशेठजींना दाखविणार्‍या लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीचा पुरता बेंडबाजा वाजला. वर्धापनदिन (नव्हे, रौप्यमहोत्सवी वर्ष) कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचा पुरता फज्जा उडाल्यानंतर वाचक मेळाव्यास गर्दी खेचण्यासाठी ‘गाणे मंगेशाचे’ हा कार्यक्रम ठेवूनही नगरकरांमधून प्रतिसाद मिळत नव्हता. जाहीरातदारांनी पाठ फिरवली. मात्र, मालक दर्डाशेठजींना (छोटेखानी करणबाबू) खूष करण्यासाठी मोठा आटापीटा करूनही काहीही साध्य झाले नाही.
सकाळने त्यांच्या अहमदनगर कार्यालयाचा वर्धापनदिन मोठ्या दिमाखात आणि जवळपास एक कोटी रुपयांचा बिझनेस घेऊन साजरा केला. यानंतर तिसर्‍या वर्धापनदिनात (दि. १० ऑगस्ट) दैनिक देशदूतने संपादक शिवाजी शिर्के यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली सकाळपेक्षा सरस आणि उजवी कामगिरी करत १ कोटी २८ लाख रुपयांचा बिझनेस सारडाशेठला दिला. वर्धापनदिनाचा सोहळाही अत्यंत दिमाखदार आणि कार्पोरेट पद्धतीने केला. टीम वर्क म्हणजे काय हे अवघ्या तीन वर्षात श्री. शिर्के आणि त्यांच्या टीमने दाखवून दिले असताना इकडे लोकमत रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना अवघ्या ४३ लाख रुपयांचा बिझनेस करू शकले.
नंदू पाटलाच्या कोल्हापूर बदलीनंतर नगरमध्ये आलेल्या अनंत पाटील यांची धडपड असली तरी त्यांना स्थानिक सहकार्य करताना दिसत नाही. पाटील आणि व्यवस्थापक बंगाळे यांना असहकार्य करण्याची भूमिका संपादकीय विभागाने ठेवल्यानेच वर्धापनदिनाच्या बिझनेसचा फज्जा उडाला. सकाळपाठोपाठ देशदूतने दिमाखदार अंक आणि बिझनेस केल्यानंतर आपण कमी पडलो असल्याची जाणिव लोकमतला झाली. दरम्यान, वर्धापनदिनाच्या (दि.१५) आदल्या दिवशी विलासराव देशमुख यांचे निधन झाले. विलासरावांचे निधन लोकमतच्या नगर कार्यालयाच्या पथ्थावर पडले. ते कारण पुढे करीत वर्धापनदिन सोहळाच रद्द करण्यात आला. त्यासाठी छोट्या बाबूजींनाही (करण) पटविले गेले. अनंत पाटील मनापासून प्रयत्न करीत असताना संपादकीय विभागाने असहकार्याची भूमिका कायम ठेवली. त्यात विभागातील असंतुष्ट आत्मे पुढे राहिले. नंदू पाटलानंतर आपणच त्या खुर्चीत बसणार असे वाटणार्‍यांनीही संपादकीय विभागात असंतोष निर्माण करण्याचे काम केले. त्याला जाहीरातीसह वितरणातील काहींनी खतपाणी घातले. त्यातून संस्थेचा तोटा झाला. मालकाला कोटीचा शब्द देणार्‍या बंगाळे- पाटलांना अर्धा कोटीचाही बिझनेस करता आला नाही.

Post a Comment

0 Comments