कोल्हापूर - सकाळ माध्यम समूहाच्या मुख्य संपादकपदी श्रीराम जयसिंगराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. "सकाळ'च्या सर्व प्रकाशनांची संपादकीय जबाबदारी ते पाहतील. "सकाळ' समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी आज येथे ही घोषणा केली. मावळते मुख्य संपादक उत्तम कांबळे "सकाळ' समूहाच्या संपादकीय सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत राहतील.
श्रीराम पवार 19 वर्षे पत्रकारितेत आहेत. बीएस्सी, एमए, एमजेसी असे त्यांचे शिक्षण आहे. सध्या ते शिवाजी विद्यापीठात "मराठी वृत्तपत्रांतील विदेशी आशयाचे प्रतिबिंब' या विषयावर पीएचडीसाठी संशोधन करीत आहेत.
'सकाळ' समूहात मागील वर्षभर ते उपमुख्य संपादकपदावर कार्यरत आहेत. प्रशिक्षणार्थी बातमीदार म्हणून कारकिर्दीस सुरवात केलेल्या पवार यांनी वरिष्ठ बातमीदार, मुख्य बातमीदार म्हणूनही काम केले. "सकाळ' समूहात कोल्हापूर आवृत्तीत ते उपवृत्तसंपादकपदावर रुजू झाले. सातारा आवृत्तीचे सहयोगी संपादक, कोल्हापूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
कोल्हापुरात त्यांनी विकासाच्या आणि सामजिक मुद्द्यांवर सातत्याने लेखन केले. पत्रकारितेला कृतिशील चळवळींशी जोडणारे अनेक उपक्रम कोल्हापुरात राबवले. "सकाळ' समूहाच्या वतीने राबवलेली वृक्षारोपणाची मोहीम, पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आणणारी "चला पंचगंगा वाचवू या' मोहीम, गणशोत्सवातील ध्वनिप्रदूषण बंद करण्यास भाग पाडणारी डॉल्बीविरोधी मोहीम, कोल्हापुरातील रस्त्यांच्या प्रश्नावर केलेले जनसंघटन आदी उपक्रमांत त्यांचा पुढाकार होता.
त्यांनी अनेक वर्षे विधिमंडळाचे वार्तांकन केले आहे. राज्यातील तसेच देशातील अनेक निवडणुकांचे व कारगिल युद्धानंतरच्या काश्मीरचे त्यांनी वार्तांकन केले होते. "जिओ पोलिटिकल स्टेटस् ऑफ काश्मीर' या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. राजकारण, पर्यावरण, नागरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लेखन केले. कोल्हापूर महापालिकेसह अनेक शासकीय कार्यालयांतील आणि योजनांतील गैरव्यवहार त्यांनी उघड केले. शोधपत्रकारितेतील कामगिरीसाठी त्यांना "कोल्हापूर भूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. कोल्हापूर प्रेस क्लबचे ते माजी अध्यक्ष आहेत. कोल्हापूर आणि साताऱ्यातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशीही ते संबंधित आहेत.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासमवेत निवडक पत्रकारांच्या चमूतून त्यांनी अमेरिका, जर्मनी आणि फ्रान्सचा दौरा केला. न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे तसेच कार्न्स येथे झालेल्या जी-20 देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेचे वार्तांकनही त्यांनी केले आहे.
ई - सकाळवरून साभार

0 टिप्पण्या