आपण लढणार आहोत,कारण आपण अजून जिंकलो नाहीत...

हाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन झाली त्या घटनेला शनिवारी म्हणजे 4 ऑगस्ट रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत.या दोन वर्षाच्या काळात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं  पत्रकार संरक्षण कायद्यासाठी जो लढा दिला,त्यासाठी जे सातत्या राखले ते अभूतपूर्व आहे.सरकारशी सातत्यानं संवाद साधताना हल्ला हा एकच विषय घेऊन आम्ही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ऩऊ वेळा भेटलो.गृहमंत्री असलेल्या आर.आर.पाटील यांची  सात वेळा भेट घेतली,प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या.मार्कन्डेय काटजू यांना दिल्लीत जावून भेटलो,विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांची दोन वेळा भेट घेतली,चळवळीला अण्णा हजारे यांचा पाठिंबा मिळविला,आणि दिल्लीत जावून तत्कालिन  राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील याची भेट घेतली,रस्त्यावर उतरून आंदोलन करताना मोर्चे काढले,निदर्शनं केली,धरणे धरले,बहिष्काराचं हत्यार उपसलं,उपोषणं केली. हे सारं करताना कुठंही हिंसाचाराचं गोलबोट लागू दिलं नाही.शिवाय ही सारी चळवळ कोणाकडून पाच पैश्याची देणगी न घेता चालविली आहे.त्याच बरोबर पत्रकारांवरील हल्ल्याच्या संदर्भात एक श्वेतपत्रिका काढून पत्रकार संरक्षण कायद्याचं गांभीर्य राज्य सरकारच्या नेरेस आणून दिलं.हे सारं करूनही आपण ज्या उद्देशानं चळवळ सुरू केली होती तो उद्देश यशस्वी झालेला नाही हे मान्य करावे लागेल .याचं कारण सरकार निगरगठ्ठ आणि संवेदनहिन बनले आहे.अशा सरकारला वढणीवर आण्ण्यासाठी आणि जिकंण्यासाठी  ही चळवळ पुढं चालू ठेवण्याचा समितीचा निर्णय आहे.या लढ्यात राज्यातील सर्व पत्रकारांचे सहकार्य मिळेल ही अपेक्षा व्यक्त करीत दोन वर्षातील चळवळीचा हा लेखाजोखा समितीच्या वर्धापनदिनाच्या निमित्तानं इथ मांडत आहे.

एस.एम.देशमुख
निमंत्रक,महाराष्ट पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती


पुढीलमजकूर एस.एम.देशमुख यांच्या ब्लॉगवर वाचा....त्यासाठी क्लिक करा.... Post a Comment

0 Comments