रिटायर्ड अरणकल्लेंना अचानक संपादकपद...

पुणे - सकाळ पुणेच्या संपादकपदी सा. सकाळच्या कार्यकारी संपादकपदावरुन रि(टायर्ड) झालेले अरणकल्ले यांची नेमणूक केलेली दिसते (कारण याची जाहीर घोषणा वा बातमी आलेली नाही) सोमवारच्या पुण्यातील सकाळमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख एका बातमीत सकाळच्या पुणे आवृत्तीचे संपादक, असा आला आहे. मात्र प्रेसलाइनमध्ये नुकतेच राजीनामा दिलेले नवनीत देशपांडे यांचेच नाव सोमवारी होते.
अरणकल्ले यांच्याकडे सा. सकाळची जबाबदारी नाईलाजाने द्यावी लागली होती. रिटायर झाल्यावर त्यांनी मुदतवाढीचे प्रयत्न करुन पाहिले परंतु प्रशासनाने नाशिकच्या विश्वास देवकरांना तेथून अचानक हलवून जुलै महिन्यात सा. सकाळच्या संपादकपदी नेमले. अरणकल्ले यांना निवृत्तीनंतरही पुण्यात बातमीदारांचे प्रशिक्षण ही जबाबदारी देण्यात आली. आता अचानक धनलाभ झाल्याप्रमाणे त्यांना पुणे संपादकपदाचा टिळा लावला. मूळचे प्रूफरीडर असलेले अरणकल्ले पूर्वी केसरीत होते. सकाळमध्येही त्याच कामासाठी ते आले नंतर बातमीदार झाले. पुण्यात चीफ रिपोर्टरपदी बढती झाल्यानंतर अचानक त्यांना विजया पाटील यांनी कोल्हापूरचे संपादक म्हणून नेमले. कुवळेकरांच्या रिक्त जागी दिक्षित आल्यामुळे कोल्हापुरची गादी रिकामी झाली होती. मात्र सौ. पाटील सकाळमधून बाहेर गेल्यावर नव्या मालकांनी अरणकल्ले यांना हटवून पुण्यात आणले. लाल-पांढ-ची सवय असलेल्या कोल्हापुरात पुण्याची अळूभाजी काही रुचलीही नव्हती म्हणा. 2005 पासून जवळपास चार-पाच वर्षे अरणकल्ले विजनवासात होते. मात्र त्यांना औट घटकेचे का होईना संपादकपद मिळाले,त्याबद्दल अभिनंदन...

ता. क. - सकाळ आता पुणे, नाशिक, सातारा या रिकाम्या जागांवर व पाठोपाठ औरंगाबाद येथे नव्या संपादकांच्या शोधात आहे असे समजते.

Post a Comment

0 Comments