मुंबई : रायगड जिल्ह्यातून प्रसिद्ध होणारं, शेकाप आमदार विवेक पाटलांच्या दै. ' कर्नाळा ' ला अशोक सुतारांनी सोडचिट्ठी दिलीय. आमदार पाटलांच्या कृपाशीर्वादाने कोणताही ' राम ' नसलेल्या ' राजा ' ला कंटाळून सुतारांनी आपला काढता पाय घेतला आहे. मितभाषी , शांत , साधे राहणीमान असलेल्या सुतारांनी दै. ' महानायक ' ला रामराम ठोकून चारएक महिन्यापूर्वी विवेक पाटलांच्या ' शाळेत ' प्रवेश केला . पण या शाळेतील ' इतर ' विध्यार्थानी सुताराना चांगलाच डीवचविण्याचा चंग बांधला होता. बेरक्याने ' मुंबई ठाण्यातल्या घडामोडी ' या मथळ्याखाली ' महानायक सोडून गेलेले '' नायक '' व्यंगचित्रकार अशोक सुतार सध्या '' कर्नाळा" दैनिकात. पौकेट कार्टून ची बहार पुन्हा फुलणार ' अशी बातमी पोस्ट केली होती, त्यानुसार ' कर्नाळा ' च्या अंकात सुतारांचे दर्जेदार पोकेट कार्टून रोज पहावयास मिळत होते. तर सुतारांची लेखमालाहि प्रसिद्ध होत होती . पण कर्नाळातील ' कॉपी पेस्ट ' ( इतर दैनिकातील वेबसाईट वरून लेख चोरून स्वताच्या नावे खपविणारे ) आट्या - ' पाट्या ' लेखकांनी सुतारांची ' खाट ' कशी टाकता येईल याकडे आपला मोर्चा वळविला होता . याच कारणामुळे ' गांधीवादी' असलेल्या सुतारांनी निमुटपणे आपला काढता पाय घेतला. सुतारांनी जवळपास मुंबई, ठाण्यातील १० एक दैनिकांत पत्रकार , व्यंगचित्रकार, लेखक , उपसंपादक अश्या पदावर काम केले आहे . तर मराठवाडा, विदर्भातील कित्येक दिवाळी अंकात त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली आहे. तर ' नवाकाळ ' चे मंत्रालय प्रतिनिधी राहुल लोंढेच्या ' बडव्या ' या पुस्तकात अनेक त्यांची दिग्गज नेत्यांची विडंबनात्मक , खुमासदार व्यंगचित्र गाजली आहेत. तर व्यंगचित्रांचे उपासक असलेले हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनीहि सुतारांच्या व्यंगचित्रांवर कौतुकाची थाप देखील मारली आहे.
जाता- जाता : सद्या हा सुतार नामक ' अवलिया' तूर्तासतरी कुठल्याही दैनिकात रुजू नाही.
0 टिप्पण्या