चंद्रपूर :चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी दिल्या जाणार्या स्पर्धा पुरस्कारांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात लोकशाही वार्ताचे सुशील नगराळे शुभवार्ता, तर गडचिरोलीचे वार्ताहर दिलीप घोडाम हे ग्रामीण वार्ता पुरस्काराचे तृतीय मानकरी ठरले आहेत.
स्व. छगनलाला खजांची स्मृतिप्रित्यर्थ ग्रामीण वार्ता पुरस्कारांचे प्रथम मानकरी संदीप रायपुरे (सकाळ गोंडपिपरी), द्वितीय मानकरी सचिन सरपटवार (लोकमत भद्रावती), तृतीय मानकरी दिलीप घोडाम (लोकशाही वार्ता-जोगीसाखरा), तर प्रोत्साहनपर बक्षिसात अमर बुद्धारपवार (पुण्यनगरी-नवरगाव), आणि सुनील बिपटे (देशान्नती-भद्रावती) यांचा समावेश आहे. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
लोकसेवा आणि विकास प्रतिष्ठानतर्फे प्रायोजित मानवी स्वारस्याच्या बातमीसाठी विशेष पुरस्कारासाठी आशीफ शेख (लोकमत समाचार-देसाईगंज) यांच्या बातमीची निवड करण्यात आली. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी आयोजित शुभवार्ता पुरस्कारासाठी सुशील नगराळे (लोकशाही वार्ता) यांच्या बातमीची निवड करण्यात आली. इतिहास अभ्यासक अशोकसिंह ठाकूर प्रायोजित हौशी छायाचित्रकारांसाठी वृत्तछायाचित्र स्पर्धा घेण्यात आली. यात चिन्ना बामणहेटी, चंद्रपूर यांच्या छायाचित्राची निवड झाली आहे. रोख एक हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. पुरस्कार स्पध्रेत विजेत्या ठरलेल्या १ ऑगस्टला आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल, अशी माहिती स्पर्धा संयोजक रवी जवळे, साईनाथ सोनटक्के, प्रवीण बतकी, रमेश कलेपेल्ली, शंकर तडस यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.

0 टिप्पण्या