वृत्तपत्रसृष्टीत नवे व्हिजन...

कोल्हापूर - कोल्हापुरातून लवकरच व्हिजन वार्ता नावाचे दैनिक सुरू होत आहे.ख्यातनाम व्हिजन ग्रुपचे संस्थापक प्रा.डॉ.रावसाहेब मगदूम यांच्या संकल्पनेतून या दैनिकाचा जन्म होत आहे.या दैनिकाबद्दल कोल्हापूर,सांगली,सातारा आदी जिल्ह्यात जबरदस्त हवा निर्माण झाली असून, येत्या काही दिवसांत वृत्तपत्रसृष्टीत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्तता वर्तविण्यात येत आहे.
एक सकारात्मक दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून, प्रा.डॉ.रावसाहेब मगदूम यांनी वृत्तपत्र सृष्टीत पाऊल ठेवले आहे.शैक्षणिक,सामाजिक,पर्यावरण,संरक्षण आदी क्षेत्रात मोठे नाव कमावल्यानंतर प्रा.डॉ.मगदूम यांनी वृत्तपत्र सृष्टीतही नाव कमावण्यासाठी कंबर कसली आहे.त्यांना गेली अनेक वर्षे वृत्तपत्रसृष्टीत काम केलेले एन.एस.पाटील यांची मोलाची साथ मिळाली आहे.पाटील यांनी यापुर्वी लोकमत,पुण्यनगरी आदी बड्या वृत्तपत्रात सरव्यवस्थापक म्हणून काम केले असून, त्यांचा अनुभव या दैनिकासाठी कामी येणार आहे.प्रा.डॉ.मगदूम आणि एन.एस.पाटील ही जोडी आता कोल्हापुरात धूम करणार असल्याची चर्चा रंगली असून, वृत्तपत्र सृष्टीत या दैनिकाबद्दल कुतहल निर्माण झाले आहे.
केवळ वल्गना न करता कृती हा व्हिजन ग्रुपचे वैशिष्ठ आहे.शिक्षण क्षेत्रापासून त्याची सुरूवात झाली असून,महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील ७०० हून अधिक कार्यालयातून ६० हजार कर्मचा-याकडून १५ लाखावर विद्याथ्र्यांना ज्ञानार्थी, स्वावलंबी व सुसंस्कारीत करण्यात येत आहे.तसेच शैक्षणिक, सामाजिक,पर्यावरण,संरक्षण क्षेत्रात उपक्रम रावबून देशाला महासत्ता बनविण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे.तसेच भ्रष्ट्राचारमुक्त भारत होण्यासाठी या ग्रुपने कामही केले आहे.एक ध्येयवेडा माणूसच देशाच्या कार्यास हात घालू शकतो,असे डॉ.मगदूम यांचे म्हणणे आहे.देशाला आर्थिक व सामाजिकदृट्या सक्षम बनविण्यासाठी प्रत्येकाने आपले कार्य प्रामाणिकपणे करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.प्रत्येक माणूस,त्यांचे घर,गाव,तालुका,जिल्हा,राज्य सक्षम आणि स्वावलंबी झाल्यास देश महासत्ता का बनू शकत नाही,असा डॉ.मगदूम यांचा सवाल आहे.
व्हिजन वार्ता दैनिक प्रचलित व प्रथितयश दैनिकापेक्षा वेगळे असल्याचा विश्वास दैनिकाचे संस्थापक प्रा.डॉ.मगदूम यांनी व्यक्त केला आहे.या दैनिकात मटका कधीच छापला जाणार नाही.तसेच व्यसनांना प्रोत्साहन देणा-या जाहिरातीही स्वीकारल्या जाणार नाहीत,असे त्यांनी सांगितले.या दैनिकातील बातम्या किसळवाण्या व डोके भंडावून सोडणा-या राहणार नाहीत.सामाजिक दृष्टीकोण समोर ठेवूनच हे दैनिक वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे या दैनिकाची हवा मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून, एक मोठी टीम कार्यरत होत आहे.
दैनिक व्हिजन वार्ता दैनिकास बेरक्याच्या मन:पुर्वक शुभेच्छा...

Post a Comment

0 Comments