मुंबई - लवकरच आपल्या भेटीला जय महाराष्ट्र नावाचे न्यूज चॅनल येणार आहे. पण हा न्यूज चॅनल खरच मराठी आहे का, हा प्रश्न मला पडला आहे. आजचा तुम्हाला माझा अनुभव सांगतो, मी नविन येनारया `जय महाराष्ट्र` चॅनलचे ऑफिस बघितले . या चॅनलच नाव जरी `जय महाराष्ट्र` असले तरी या मध्ये काम करणारा एकही व्यक्तीला धड मराठी बोलता येत नव्ह्ते . त्यामुळे काही वेळ मला असे वाटले की, मी मराठी चॅनलच्या ऑफिस मध्ये आहे की हिंदी?
मी बाहेर बसलो होतो, तेव्हा एक व्यक्ति येथे आला. तो मराठी बोलत होता पण स्वागतासाटी बसलेल्या मुलीने त्यांना मुझे मराठी नहीं आती, आप हिंदी में बात करो असे सांगितले.` मराठी न्यूज चॅनल असून या मुलीला मराठी येत नाही..मला स्वत: ला लाज वाटली....पण नंतर मला माहित झाले की, फक्त तिलाच नाही तर या न्यूज चॅनलच्या बहुतेक ज़णाना निट मराठी येत नाही, आणि ते स्वाभाविकच आहे कारण या न्यूज चॅनलचे मालक सुधाकर शेट्टी आहेत. ते व्यवसायाने बिल्डर आहेत, या न्यूज चॅनलचे हेड वाहिद अली खान हेही उत्तर भारतीय आहे..यांना मराठीचा की ममताचा हेच माहित नाही....मराठी न्यूज चॅनलचा हेड असून सुद्धा त्याला मराठी येत नाही....अरे लाज वाटायला पाहिजे न्यूज चॅनलच्या मालकाला ....काय या शेट्टीना कुणी मराठी हेड भेटलाच नाही की काय असे मला वाटले.
या न्यूज चॅनलचा बहुतेक स्टाफ हे उत्तर भारतीय आहेत. आता हेडलाच मराठी येत नाही म्हटल्यावर त्यांना तरी कशी येणार?...एवढच नाही तर या न्यूज चॅनलचा वेब डीझांयनर अजय कुमार मिश्र हाही मूळचा उत्तर भारतीय आहे तसेच एक्सिक्युटीव्ह प्रोडूसर प्रीती गुप्ता हीपण बाहेरची आहे. यांना कुणालाच जर धड मराठी बोलता येत नसेल तर या न्यूज चॅनलला आपण मराठी न्यूज चॅनल म्हटले तर पाप आहे..त्यांचा एक रिपोर्टर ABP माझा न्यूज चॅनल वरून पॉइंट लिहत होता आणि बातमी करत होता.त्यामुळे या न्यूज चॅनलचे नाव `जय महाराष्ट्र` नसून `जय उत्तर प्रदेश चॅनल` असे केले पाहिजे.....
एक अनामिक
0 टिप्पण्या