बीड
- पत्रकार संजय मालाणी यांच्यावर हल्ला करणा-या चार हल्लेखोरांना
पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यामध्ये संतोष पवार,राजु शेख,शेख शिराज,आणि
स्वप्नील कुलकर्णी अशी हल्लेखोराची नावे आहेत अशी माहिती जिल्हा पोलिस
अधिक्षक दतात्र्य मडंलिक यांनी दिली.
गणेश विसर्जनाच्या पुर्वसंध्येला संजय मालाणी यांच्यावर हल्ला झाला होता.या हल्ल्यातील चौघांना तात्काळ ताब्यात घेतल्याने पोलिस प्रशासनाचे सर्व स्थरातून कौतूक केले जात आहे.या चौघांनी पोलिसाच्या समोर गुन्हयाची कबुली दिली.हल्याचे कारण विचारता हल्लेखोरांनी मालाणी यांच्या बातम्यामुळे आपल्या गुत्तेदारीला धोका निर्माण झाल्याचे सागितले.
संजय मालाणी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रसाशनाने दखल घेऊन तात्काळ चक्र फिरवीले .संजय मालाणी यांच्यावरील हल्ला म्हणजे केवळ पत्रकारितेवरीत हल्ला नव्हता तर बीड जिल्ह्यातील कायदा व सुुवेवस्था बिघडल्याचे धोतक होते.मात्र पोलिस प्रशासनाने वरील चौघाना ताब्यात घेऊन कायदा व सुुव्यवस्था अबादित असल्याचे जिल्ह्यातील नागरीकांना दाखवून दिले.संजय मालाणी यांनी आपल्या वृत्तपत्रातुन गुत्तेदारीत होणारी निकृष्ठ कामे आणि प्रशासनात होत असलेल्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड केली होती.त्यातूनच संजय मालाणी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.हल्लेखोरांनी आपली गुत्तेदारी असल्याचे स्पष्ट केले आहे मात्र या हल्लेखोरांची खरोखरच गुत्तेदारी आहे का? हे शोधून काढण्याचे काम पत्रकारांना करावे लागणार आहे ,हल्लेखोरांची गुत्तेदारी नसेल तर हल्लयाच्या पाठीमागे आनखी कोणकोण मोठे मासे आहेत याचाही तपास निश्चीतच घ्यावा लागेल.मात्र बीड जिल्ह्यातील राज्य कत्र्यांकडून संबंधीत प्रकरण मिटवण्यासाठी राजकीय दबाव वाढत असल्याची चर्चा बीड शहरात केली जात आहे.संजय मालणी यांच्यावर केलेल्या प्राणघातक हल्ला करणा-या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात आल्याने पत्रकारांच्या वतीने पोलिस प्रशासनाचा सत्कार करण्यात आला.