औरंगाबाद - दैनिक लोकमतचे उपसंपादक विलास इनामदार (वय ३५ )यांचा आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुत्ती रेल्वे स्टेशनवर गुरूवार दि.११ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता रेल्वे अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूमुळे लोकमत परिवार तसेच अनेक पत्रकारांना मोठा धक्का बसला आहे.
विलास इनामदार व त्यांचे मित्र काही दिवसांपुर्वी तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. गुरूवारी रेल्वेने औरंगाबादला परतत असताना, आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुत्ती रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबली असता, इनामदार हे पाणी पिण्यासाठी खाली उतरले.मात्र याचवेळी रेल्वे सुरू झाल्यानंतर ते घाईत रेल्वेमध्ये चढत असताना, त्यांचा पाय खाली निसटला व रेल्वेखाली सापडून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
कै.विलास इनामदार हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच, अनेकांना मोठा धक्का बसला. रिपोर्टर ते उपसंपादक पदावर ते सामना,लोकमत, देवगिरी तरूणभारत पुन्हा लोकमतमध्ये कार्यरत होते.लोकमतमध्ये त्यांनी एकूण आठ वर्षे सेवा केली.त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.कै.इनामदार यांच्या परिवाराच्या दु:खात बेरक्या व बेरक्याचे असंख्य वाचक सहभागी आहेत.