व्हिजन वार्ता लवकरच...

कोल्हापूर - चिरीमिरीसाठी लाचार नसणारं, धनदांडग्यापुढे न झुकणारं, सत्यासाठी आग्रही, भ्रष्ट्राचार विरोधातील लढाईत मागे न मागे हटणारं असे ब्रिद घेवून येणारे दैनिक व्हिजन वार्ता लवकरच सुरू होत आहे.या दैनिकाच्या प्रकाशनाची तारीख अंद्याप जाहीर झाली नसली तरी दीपावलीपुर्वी हे दैनिक वाचकांच्या हाती पडणार आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, बेळगाव,सोलापूर, अहमदनगर आदी आठ जिल्ह्यात वितरीत होणा-या या नव्या दैनिकाची टीमची जुळवाजुळव पुर्ण झाली आहे. सरव्यवस्थापक एन.एस.पाटील आणि कार्यकारी संपादक मुकुंद फडके यांच्यामुळे सर्वच जिल्ह्यात चांगली टीम तयार झाली आहे.सर्वच ठिकाणी अद्यावत कार्यालये सुरू होत असून,वेगळ्या पध्दतीचे व आक्रमक दैनिक सुरू होत असल्यामुळे वाचकांनाही या दैनिकाची प्रतिक्षा लागली आहे.
सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात बुकींग सुरू झाली असून, पश्चिम महाराष्ट्रातील दैनिकात यामुळे स्पर्धा निर्माण होत आहे.
या दैनिकाचा सर्वाधिक फटका लोकमत,पुढारी आणि पुण्यनगरीला बसला आहे. या दोन दैनिकातील सर्वाधिक कर्मचारी व्हिजन वार्ताच्या वाटेवर आहेत.या दैनिकाला बेरक्याच्या मन:पुर्वक शुभेच्छा..


त्यांच्या वार्तामध्ये
बघा व्हिजन आहे
बकिंच्याकडे मात्र
कन्फ्युजन आहे !

ते नसणार बघा

भांडवालदाराचे बटिक
चांगले ठोकणार आहे
भ्रष्टाचाराचे खाटिक !!

ते झुंजणार आहे

सत्यमेव जयतेसाठी
डोक्यात मारणार आहे
नाठाळांच्या काठी !!!
  

विलास फुटाणे


.